Grampanchyat Election Result Sakal
नांदेड

Gram Panchyat Election Result : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने

लोणी खुर्द मध्ये प्रसेनजीत लोणे तर दाभडम़ध्ये संगिता दादजवार विजयी.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) - तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने लागला असुन, लोणी खुर्द येथील प्रभाग क्रमांक तीन मधुन प्रसेनजीत राजेश लोणे हे विजयी झाले आहेत तर दाभड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत संगिता दिपक दादजवार ह्या निवडुण आल्या आहेत.या निवडणूकीचा निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके वाजवून एकच जल्लोष केला.

तालुक्यातील लोणी खुर्द व दाभड ग्रामपंचायतीच्या दोन जागेसाठी रविवारी (ता पाच ) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे.. तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी मतमोजणी करण्यात आली.लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी उभे असलेल्या प्रसेनजीत लोणे यांना २७६ मते मिळाली तर त्यांचें प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यपाल लोणे १५३मते मिळाली.

दाभड ग्रामपंचायतीची पोटनिवडणुकीत संगिता दिपक दादजवार ह्या विजयी झाल्या त्यांना २१७ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मिरा अरविंद पांचाळ. १७५ मते मिळाली.संगिता दिपक दादजवार ह्या ४२ मतांनी विजयी झाल्या आहेत..या मतमोजणी प्रक्रियेत विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर, तलाठी रवी, तलाठी मोटे, गिरीश गलांडे, विजय निकम यांनी सहभाग नोंदविला.

विजयी उमेदवार प्रसेनजीत लोणे बीटेक असुन तालुक्यातील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत.त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात जल्लोष केला.यावेळी राजेश लोणे,सुदाम लोणे, विजय लोणे, यशवंत लोणे, बळीराम शिंदे,भूजंग लोणे, बाळू लोणे, प्रभाकर लोणे आदी उपस्थित होते.

निवृत्तीराव लोणे यांची तिसरी पिढी राजकारणात..

तालुक्यातील राजकारणात कांग्रेसचे दिवंगत नेते निवृत्तीराव लोणे यांचा खुप मोठा दबदबा होता.त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र संजय लोणे, राजेश लोणे यांनी राजकीय वारसा सक्षमपणे पुढे चखलविला.बाजार समितीचे माजी संचालक संजय लोणे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली.या निवडणूकीत निवृत्तराव लोणे यांचें नातु प्रसेनजीत लोणे हे विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT