ashok chavan latest news 
नांदेड

'शिंदे, फडणवीसांनी सरकार बनवण्यासाठी घेतलेली संधी जगजाहीर'

सरकार पडले तरी नवीन सरकारकडून विकासकामे होणार, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही

सकाळ डिजिटल टीम

सरकार पडले तरी नवीन सरकारकडून विकासकामे होणार, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही

मराठवाडा व नांदेड विकासापासून दूर होते. परंतु माझ्या मंत्री पदाच्या काळात खुंटलेल्या विकास कामाला गती मिळाली. मुख्यमंत्री असताना जेवढी कामे झाली नाहीत तेवढी गेल्या अडीच वर्षात झाली आहेत. जालना - नांदेड समृद्धी मार्ग पूर्ण होणार असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत, याचा आनंद आहे, असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकार बनवण्यासाठी संधी घेतली. ती कशी घेतली, हे जगजाहीर आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्याबरोबर हे सरकार किती दिवस चालेल, याबाबत आत्ताच काही सांगणे उचित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह इतरही निर्णय काय येतात, हे पाहणेही महत्वाचे आहे. सध्या त्यांना शुभेच्छा, असं वक्तव्य करत चव्हाण यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, नांदेड शहरातील रस्त्याच्या विकास कामांसाठी शंभर कोटी रूपये महापालिकेकडे जमा आहेत. ५० कोटी जिल्हा प्रशासनाकडे आहेत. या कामांसाठी रक्कम वर्ग झाली असून रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. सरकार पडले तरी नवीन सरकारकडून विकासकामे होणार आहेत, त्यामुळे नांदेडकरांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. जिल्हा नियोजन समिती व इतर कामे नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने रद्द केली आहेत. कामे बंद झाल्याचा असुरी आनंद घेण्यापेक्षा विकास कामे व जिल्ह्याचा विकासाकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, चव्हाण यांनी नांदेड जिल्हा, मराठवाडा व राज्यामध्ये केलेल्या विविध विकासकामांबद्दल माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला आहे. अनेक विकास कामे मार्गी लागली. पुढेही विकास कामाची गती अशीच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे सहभागी झाले. त्यांनी शिंदे यांच्यासाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्याग लक्षात घेऊन त्यांना नांदेडचे पालकमंत्री केल्यास चांगलेच होईल. आम्ही त्यांना मदत करू, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT