अशोक चव्हाण sakal
नांदेड

मराठा आरक्षणावर सरकार ठाम, अशोक चव्हाण यांची माहिती

अभय कुळकजाईकर

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ठाम आहे. केंद्र सरकारकडून अजूनही संसदेत फक्त चर्चाच होत आहे. अजूनही संधी गेलेली नाही. केंद्राने निर्णय घेतला तर पुढील प्रक्रियाही लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांनी सोमवारी (ता.२३) येथे पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी समाजाच्या (Obc Community) २७ टक्क्यांच्या आरक्षणाबाबतही मुख्यमंत्री लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या (Congress Party) वतीने स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार, नांदेड, लातूर (Latur), परभणी (Parbhani) व हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांतील पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता.२४) येथे (Nanded) करण्यात आले आहे. त्यानिमित्त चव्हाण यांनी माहिती दिली.

प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा खरा इतिहास सर्वसामान्यांसमोर ठेवण्यासाठी कॉँग्रेस प्रयत्नशील असून त्या दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही पक्षांकडून चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे स्वातंत्र्यातील योगदान जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच आगामी काळातील ध्येय धोरणांवर चर्चा करण्यासाठी कार्यक्रम होतील, असे ते म्हणाले. देशप्रथम असे म्हणणाऱ्या भाजपने राष्ट्रध्वजावर पक्षाचा ध्वज ठेवल्यामुळे आता याबाबत भाजपनेच अधिक खुलासा करावा, असेही चव्हाण म्हणाले. धर्म, कट्टरतावादामुळे अफगाणिस्तानमध्ये सर्वसामान्यांना गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

महामार्गाचे १८ पॅकेज फेल

राष्ट्रीय महामार्गाचे मराठवाड्यात २१ पॅकेज असून त्यापैकी १८ पॅकेज हे फेल झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे जवळपास तीन हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय निवासस्थाने, कार्यालये यांची डागडुजी वेळोवेळी करावी लागते. त्यामुळे त्यात गैर काही नाही. काही चुका निर्दशनास आणून दिल्या तर त्याबाबत लक्ष घातले जाईल. नांदेडमधील गोळीबाराच्या घटनेसंदर्भात गुंडांना किंवा अपप्रवृत्तींना राजकीय आश्रय मिळू नये, हे महत्त्वाचे आहे. सर्वच राजकीय पक्षांनीही हे मान्य केले तर वाळू, दारू, मटकेवाले यांच्यावर पोलिस नक्कीच कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. देगलूरच्या आगामी पोटनिवडणुकीची तयारी कॉँग्रेसतर्फे सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक आघाडी आणि जिल्हा स्तरावरील निर्णय लक्षात घेतले जातील.

- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT