अशोक चव्हाण esakal
नांदेड

Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार : अशोक चव्हाण

देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी नाकारले आहे.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि. नांदेड) : जिल्हात विकास कामे मोठ्या गतीने होत आहेत. देगलूर ,बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Deglur Bypoll) भाजपने राज्य व देशपातळीवरील नेते प्रचारासाठी आणले. पण जनतेने काँग्रेसच्या उमेदवाराला खूप मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. महागाई वाढत आहे. पाच राज्यातील निवडणुकाजवळ आल्यामुळे तीन कृषी कायदे रद्द (Farm Bills Repeal) करण्यात आली आहेत. देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी नाकारले आहे. राज्यातील आघाडीचे सरकार पाच वर्षे राहणार आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल उद्या पडेल असे भाकीत वारंवार केले जात आहे. तारिख पे तारीख देण्यात येत आहे. आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. ( 2 Years Of Mahavikas Aghadi Government)

काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मार्च महिन्यात सरकार पडेल असे भाकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री चव्हाण यांनी शनिवारी (ता.२७) राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे राहणार आहे व विकास कामे आम्हीच करणार आहोत, असे ठामपणे सांगितले. तसेच राज्यातील सामाजिक वातावरण बिघडविण्याचे काम केले जात आहे. जनतेने जागृत राहावे. महागाई सतत वाढत आहेत. गॅस, पेट्रोल आदींच्या किंमतीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतली आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली. या बैठकीला आमदार अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी, संजय देशमुख, सुरेश हाटकर, अब्दुल गफार, राजु शेटे, बालाजी गव्हाणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT