Nanded Lok Sabha Election 2024 Latest News  
नांदेड

Nanded Lok Sabha Election 2024 : 'वंचित'चे नांदेडमधील लोकसभेचे उमेदवार आहेत कोट्यधीश! किती अन् कुठे आहे संपत्ती? वाचा

Nanded Lok Sabha Election 2024 Latest News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

रोहित कणसे

Nanded Lok Sabha Election 2024 Latest News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादेखील सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात ता. २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

नांदेड मतदारसंघात तिरंगी लढत

कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यासाठी नांदेड मतदारसंघात होणारी निवडणूक महत्वाची असून त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपने नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण मैदानात असणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड मतदार संघात ४२ वर्ष वय असलेल्या अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली आहे. भोसीकर यांचं शिक्षण बीए, एलएलबी पर्यंत झाले असून ते कोट्यधीश आहेत. नुकतेच त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिक्षापत्रात त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे.

ॲड अविनाश विश्वनाथ भोसीकर (वय ४२ वर्षे, रा. जुना कौठा, नांदेड.) हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांचं शिक्षण बीए, एलएलबी इतक झालं असून त्यांची एकीण संपत्ती पुढील प्र

हातातील रोख रक्कम : तीन लाख, पत्नी ज्योती भोसीकर : दोन लाख

बॅंक खात्यातील ठेवी : अकोला अर्बन ः एक लाख ५० हजार, पत्नी ः २० हजार

वाहने : दोन चाकी वाहन : एक (६० हजार), चार चाकी वाहने ः दोन (४० लाख ५० हजार)

सोने, चांदी दागिने : पत्नीच्या नावाने : सोने : शंभर ग्रॅम : सहा लाख ७० हजार, चांदी : शंभर ग्रॅम : दहा हजार

एकूण स्थूल मूल्य : ४५ लाख ६० हजार, नऊ लाख

एकूण कर्ज : दोन चार चाकी वाहनांचे : ३१ लाख रुपये, इतर कर्ज : २८ लाख रुपये

जंगम मालमत्ता : स्वतःची ४५ लाख ६० हजार, पत्नीच्या नावे : नऊ लाख

स्थावर मालमत्ता : दोन कोटी ९० लाख, पत्नीच्या नावे : ४० लाख, अवलंबित व्यक्ती : ६० लाख

शेतजमीन : किरोडा (ता.लोहा) येथे चार एकर ३८ गुंठे (३१ लाख ३५ हजार रुपये), चिखलभोसी (ता. कंधार) येथे तीन एकर २० गुंठे आणि कलोते मोकाशी (ता. खालापूर, जि. रायगड) येथे १६ गुंठे (एक लाख ५५ हजार) तसेच पत्नीच्या नावे बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथे तीन एकर ११ गुंठे शेती (२२ लाख रुपये)

बिगरशेती जमीन : कोठा येथे १८०० चौरस फुट प्लॉट, गोपाळचावडी येथे १२०० चौरस फुट प्लॉट, जुना कौठा येथे १८५० चौरस फुट प्लॉट

-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT