फोटो 
नांदेड

‘या’ माफियांवर आली सक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरूच असून कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये गोदावरी नदीसह जिल्हा परिसरातील सर्वच नदी पात्र त्यांच्याकडून ओरबाडून काढण्यात येत आहे. महसुल व पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन रात्रभर यंत्राच्या साह्याने हजारो ब्रास वाळू उपसा करून वाहतुक करत आहेत. नांदेड तहसिलच्या पथकाने शनिवारी (ता. ३०) कारवाई करून ४० तराफे जाळले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा या बंदोबस्तात लागली आहे. याचा फायदा वाळू माफियांनी घेतला आहे. गोदावरी नदी पात्रातून वेगवेगळ्या वाळू घाटावर अवैध मार्गाने उपसा सुरू आहे. लॉकडाउनमध्ये प्रशासन गुंतल्याचे पाहून वाळू माफियांनी आपले डोके वर काढले आहे. मात्र त्यांना ठेचून काढण्याचे काम महसुल प्रशासनाने हाती घेतले आहे. 

नांदेड तहसिल कार्यक्षेत्रांतर्गत मोठी कारवाई

नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने शनिवार (ता. ३०) पहाटे वाहेगाव, पिंपळगाव निमजी व भनगी (ता. नांदेड) गोदावरी पात्रात तिन वेगवेगळी पथकांने कारवाई करत ४० तराफे ताब्यात घेतले. हे तराफे स्फोट करत उडवून देण्यात आले. या वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती नायब तहसिलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

४० तराफे जाळून नष्ट

तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रभारी तहसिलदार सारंग चव्हाण व नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांचे पथक वरील गावाच्या वाळू घाटावर धडकले. यावेळी हजारो ब्रास वाळूचा उपसा करुन वाहतुक करत असतांना आढळून आले. महुसल पथक एकदम समोरच आल्याने अनेकांनी त्या ठिकाणाहून धून ठोकली. पथकानी पोलिसांच्या मदतीने वाळू उपसा कारणारे ४० तराफे बाहेर काढले. सदरचे तराफे नष्ट करण्यात आले. तराफे खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने सारंग चव्हाण व मुगाजी काकडे स्वतः बोट घेऊन नदीत उतरले. यावेळी विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यांचा होता सहभाग

या कारवाईत मंडळ अधिकारी कोंडीबा नागरवाड, गजानन नांदेडकर, अनिल धुळगंडे, चंद्रकांत सहारे व अनिरुद्ध जोंधळे, तलाठी उमाकांत भांगे, विजय रणवीरकर, आकाश कांबळे, विजय रणवीरकर, संताजी देवापूरकर यांच्यासह पोलिस कर्मचारी यांचा सहभाग होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT