file photo 
नांदेड

खबरदार....शेतकऱ्यांना फसवले तर....

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : खरीप हंगाम जवळ आल्यामुळे कृषि विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या काळात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे तसेच बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर एक तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकाची स्थापना केली आहे. बियाणे तसेच खतांचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाइ करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

खरिपासाठी आठ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाकडून खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीपात सात लाख ९६ हजार सहाशे हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे तीन लाख ९५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. यासोबतच कपाशी दोन लाख हेक्टरवर लागवड होइल. यासोबतच तूर, ज्वारी, उडीद, मुगाचीही पेरणी अपेक्षीत आहे. 

बियाणे- खतांचा मुबलक साठा
पेरणीसाठी जिल्ह्याला सार्वजनिक एक लाख ६५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर कपाशीची नऊ लाख ६५ हजार पॉकीटे आवश्यक आहेत. तर प्रत्यक्षात १४ लाख पन्नास हजार बिजी टूची पॉकिटे मिळणार आहेत.  जिल्ह्यासाठी रासायनिक खताचे दोन लाख २७ हजार मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. रासायनिक खताचा एप्रिल अखेरपर्यंत ५० हजार मेट्रीक टन खते जिल्ह्यास पुरवठा झाली आहेत.

सोयाबीनची उगवणशक्ती तपासून वापरणे
घरगुती सोयाबीन बियाणाची उगवणशक्ती तपासून वापरणे तसेच पेरणीपुर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करणेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके या कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत चालू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे. 

अडचणी आल्यास कृषि विभागाशी संपर्क करावा
या अनुषंगाने कृषि सेवा केंद्रावर खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी व बियाणे, खते शेतकऱ्यांना गटामार्फत खरेदी करण्यासाठी कृषि विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कृषि निविष्ठांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषि निविष्ठांची वाहतूक सुरु आहे. यामध्ये काही अडचणी आल्यास संबधित तालुका कृषि अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्यामार्फत निराकरण करण्यात येत आहे.

१७ भरारी पथकाची स्थापना
कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. या भरारी पथकाद्वारे सनियंत्रण करण्यात येत आहे. याअनुषंगाने कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रधारकांना मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनानूसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्व कृषि निविष्ठा केंद्र, वितरकांनी चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा पुरवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 

बियाणे खरेदी करताना घ्या काळजी
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच कृषि निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन घ्यावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत. तसेच या संदर्भात तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी, असे आवाहनही श्री चलवदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT