File photo 
नांदेड

Video : पक्षीही घेत आहेत संधीचा फायदा, कसा? ते वाचाच

श्याम जाधव

नांदेड : लॉकडाउनमुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही विद्यार्थी व प्राध्यापकांची वर्दळ कमी झालेली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरामध्ये विविध जातींचे पक्षी मनसोक्त फिरताना दिसत आहेत.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी देश २४ मार्च पासून लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठांसह शैक्षणिक संकुलंही बंदच आहेत. शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचीही वर्दळ रोडावलेली असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्येही वर्दळ कमी झाल्याने या संधीचा फायदा विविध प्रकारच्या पक्षी घेताना दिसत आहे. एरवी या परिसरामध्ये नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पक्ष्यांना मनसोक्त वावरता येत नाही. झाडांवरच त्यांना अडकून पडावे लागते. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा परिसर हा मोठा आहे. या परिसरात विविध प्रकारची झाडे असल्याने सर्वत्र हिरवाई पसरलेली आहे. त्यामुळे लॉकडाउनचा फायदा घेऊन अनेक नागरिक मोकळी हवा घेण्यासाठी परिसरामध्ये सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारत आहेत. विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी देखील दररोज या परिसरामध्ये फेरफटका मारतात. दरम्यान त्यांच्या दृष्टीने पक्षीही या परिसरामध्ये मनसोक्त फिरताना दिसून आल्याने त्यांनी पक्ष्यांच्या हालचाली मोबाईलच्या कॅमेऱ्यात व्हिडिओस्वरूपात टिपल्या आहेत. 
  
कॉपरस्मिथ बार्बेट
या पक्षाला क्रिमसन-ब्रेस्टेड बार्बेट म्हणतात. हा पक्षी विशिष्ट आवाज काढतो. तांबट आळीत तांबटाचा; जसा तांब्याच्या भांड्यावर ठोके देण्याचा आवाज येतो तसा एकसुरी ‘पुक-पुक-पुक-पुक’ असा आवाज काढतो. त्यामुळे मराठीमध्ये याला ‘तांबट’ असेही म्हणतात. हा गडद हिरवट रंगाचा पक्षी आहे. त्याच्या डोक्यावर शेंदरी रंगाचा टीळा व मान पिवळसर असून मानेच्या खाली लाल पट्टा आहे. हा पक्षी मेट्रोनोमिक कॉलसाठी ओळखला जातो. 

हे देखील वाचलेच पाहिजे - Video : लेखक पृथ्वीराज तौर यांनी खुला केला बालसाहित्याचा खजिना
 
कॉमन हूपो
गवताळ मोकळ्या जागेवर कॉमन हूपो हा पक्षी अन्नग्रहण करतानाचा व्हिडिओ डॉ. मुलानी यांनी चित्रित केला आहे. ज्या मध्ये जमिनीच्या आतील आळ्या, मुंग्या आपल्या टोकदार लांब चोचीने वेचून खात आहे. या प्रक्रियेत हा पक्षी अत्यंत व्यस्त असतो. हा पक्षी विशिष्ट पद्धतीने खाली-वर डोके हलवत ‘हु-पो-पो, हु-पो-पो’ किंवा ‘हुद-हुद-हुद’ असा सुरेख आवाज काढतो. त्यामुळे या पक्ष्याला मराठी मध्ये ‘हुदु-हुदू’ म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या डोक्यावर पंख्याच्या आकाराचा तुरा असून त्याच्या पंखावर काळे पांढरे पट्टे आहेत. ज्यामुळे हा पक्षी अत्यंत सुरेख दिसतो आणि रुबाबदार पनाने चालतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT