बिलोलीत भाजपला गळती 
नांदेड

बिलोलीत भाजपला गळती; राष्ट्रवादीत इनकमिंग

भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड व माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले यांच्या नेतृत्वात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करुन तालुक्यात भाजपला गळती तर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाली आहे.

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी ( जिल्हा नांदेड ) : नांदेड येथील एमजीएम कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड व माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हायगले यांच्या नेतृत्वात अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करुन तालुक्यात भाजपला गळती तर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु झाली आहे.

बिलोली तालुक्यातील ममदापूर येथील रहिवाशी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गायकवाड व माजी जिल्हापरिषद सदस्य संग्राम हायगले यांच्या नेतृत्वात ता. 27 रोजी नांदेड येथील एमजीएम कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेस संवाद मेळाव्यात बिलोली तालुक्यातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, डॉक्टर सेल प्रदेशध्यक्ष काळे आदींच्या उपस्थितीमध्ये सुभाष गायकवाड, संग्राम हायगले, बाबाराव पाटील साखरे, शंकर साखरे, अमरनाथ कांबळे, बाबू पाटील चरकुलवार, सिद्राम पाटील मुंके, शेख पाशा मोहिद्दीन, राजू सोनकांबळे, राम हातोडे, मोहन नरहारे, शिवकुमार पटणे, शंकर सोनकांबळे, विकास माचनुरे आदीनी पक्ष प्रवेश केला आहे.

हेही वाचा - कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने आवकेतही वाढ होत आहे

हा पक्ष प्रवेश आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे मानले जात असले तरी, येणाऱ्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये गायकवाड यांच्या प्रदीर्घ राज्यकीय अनुभवाचा फायदा होणार आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील अनेक माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते यांचा पक्षात समावेश करण्यात येणार असला तरी या पक्ष प्रवेशाबद्दल मोहन पाटील टाकळीकर, वसंत सुगावे, जिल्हा चिटणीस गोसोद्दीन खुरेशी, प्रा. जांभरुनकर, तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, कार्याध्यक्ष नागनाथ खेळगे, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष गंगाधर प्रचंड, माजी सभापती व्यंकट पांडवे, उत्तम पाटील शेळगावकर, भास्कर पाटील भिलवंडे, कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार, उपाध्यक्ष शेख इशु आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT