Loksabha Election 2024 sakal
नांदेड

Loksabha Election 2024 : भाजपचे नांदेडवर विशेष लक्ष ; नेत्यांच्या दौऱ्यांमुळे चर्चा,पदाधिकाऱ्यांचा उत्साह दुणावला

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉँग्रेसला राम राम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काही दिवसातच भाजपमय झाला आहे. दररोज भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. एका अर्थाने सध्या प्रभावी विरोधकच उरला नसल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉँग्रेसला राम राम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्हा काही दिवसातच भाजपमय झाला आहे. दररोज भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. एका अर्थाने सध्या प्रभावी विरोधकच उरला नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचेही नांदेडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी नांदेडचा दौरा केल्याने चर्चा सुरू झाली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये विशेष लक्ष दिले आणि नांदेडमधील प्रताप पाटील चिखलीकर, सुर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेतले. या नेतेमंडळींनी नांदेड जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, समोर विरोधक म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिग्गज नेते होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला. २०१९ मध्ये नांदेडमध्ये भाजपचा खासदार झाला. शेजारील मतदारसंघातही हिंगोलीत शिवसेना तर लातूरमध्ये भाजपचा खासदार झाला. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात किनवट, नायगाव, मुखेड येथे भाजपचे आमदार झाले. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती होऊनही भाजपला म्हणावे तसे यश मिळत नव्हते.

दरम्यान, मागील काही महिन्यात काँग्रेसमधून भाजपात येणाऱ्याची संख्या वाढू लागली आणि अशोक चव्हाण यांनी मोठा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला. दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी देखील मराठवाडा आणि विशेष करून नांदेडवर लक्ष केंद्रित केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडला विमानतळावर येऊन भाजपच्या तब्बल ४८ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबतही विशेष चर्चा केली. त्यामुळे ही सर्व परिस्थिती आणि आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने नांदेडवर विशेष लक्ष दिल्याचेच दिसून येत आहे.

दिग्गजांची भेट

नुकतेच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा नांदेडच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पक्षनिरीक्षक माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार जयकुमार रावल यांनी नांदेडला येऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही नांदेडच्या विमानतळावर येऊन सर्वांना भेटून गेले.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मी राज्यसभेचा खासदार झालो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माझी पहिलीच भेट होती. विशेष म्हणजे ते नांदेडला आले त्यामुळे मी संधी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. काही वेळ चर्चाही करून सध्याच्या परिस्थितीची माहिती मी त्यांना दिली.

- अशोक चव्हाण, खासदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेडच्या विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. तीनही जिल्हाध्यक्षांसह ४८ पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधत हस्तांदोलन केले. त्यामुळे पदाधिकारी उत्साहित असून त्यांच्यातील उत्साह दुणावला आहे.

- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT