Nanded Crime News esakal
नांदेड

Nanded | धक्कादायक ! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून नांदेडमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

अभय कुळकजाईकर

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी (ता.पाच) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी जवळून गोळ्या घातल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील शारदानगर भागात सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान बियाणी कारमधून उतरून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारसमोर दुचाकीवर थांबलेल्या दोघांनी उतरून त्यांच्याजवळ येऊन गोळीबार केला. त्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या लागल्या. (Business Man Killed In Nanded)

त्यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. घटनास्थळी पोलिस आले त्याचबरोबर त्यांना खासगी रुग्णालयात तत्काळ गाडीतून आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत गाडीत असलेला चालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यावेळी त्यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ही सुरक्षा कमी करण्यात आली होती. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला ? याचा शोध सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नांदेडमध्ये तणावाचे वातावरण

ही घटना कळाल्यानंतर नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी खासगी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. आजी-माजी लोकप्रतिनिधींसह पोलिस अधिकारी रुग्णालयात तत्काळ आले. दरम्यान, नाईकनगर, आनंदनगर आणि परिसरात संतप्त झालेल्या जमावाने काही दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे या भागातील दुकाने बंद करण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी, उद्योजक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT