flat flat
नांदेड

फ्लॅट, प्लॉट घेत असाल तर सावधान! खरेदी करताना 'ही' घ्या काळजी

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे त्याचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसला आहे. त्यात फ्लॅट, प्लॉट खरेदी विक्रीचेही व्यवहार जवळपास ठप्पच होते

अभय कुळकजाईकर

नांदेड: नांदेड शहरातील महापालिका हद्दीत आणि शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर फ्लॅट आणि प्लॉट शिल्लक आहेत. मात्र, खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घ्यावी. कारण अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्लॅट, प्लॉट खरेदी करताना खात्री करूनच ग्राहकांनी निर्णय घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे त्याचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसला आहे. त्यात फ्लॅट, प्लॉट खरेदी विक्रीचेही व्यवहार जवळपास ठप्पच होते. आता गेल्या काही दिवसांपासून हे व्यवहार कमी अधिक प्रमाणात सुरू झाले आहेत. मात्र, असे असले तरी प्लॅट, प्लॉट खरेदी करताना ग्राहकांची फसवणुक होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करावेत. कारण एकच फ्लॅट, प्लॉट दोन किंवा त्याहून अधिक जणांना विक्री केल्याची घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर गोदावरी व इतर नदीकाठी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन झोन या संदर्भातील माहिती घेऊन खरेदीचे व्यवहार करावेत तसेच शासनाने काही जागांवर उद्यान, शाळा, रुग्णालय, मैदान, रस्ते आदींसाठी आरक्षण टाकलेले असते त्यामुळे त्याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे.

फ्लॅट खरेदी करताना ही घ्या काळजी

- संबंधित विभागाची बांधकाम परवानगी हवी

- अपार्टमेंटची मालकी कुणाची त्याची करा चौकशी

- भोगवटा प्रमाणपत्र तपासून घ्यावे

- मंजूर नकाशानुसार बांधकाम असल्याची खात्री करा

- बिल्टअप आणि सुपर बिल्टॲपची माहिती घ्या

- बॅँकेचे किंवा इतर कर्जाच्या बोजाची माहिती घ्यावी

प्लॉट घेताना हे तपासून बघा

- मंजूर ले आऊट असल्याची खात्री करा

- कलेक्टर येणे परवानगी तपासून घ्या

- सात - बारावर विक्री करणाऱ्याच्या नावाची खातरजमा करा

- जागा अकृषिक असल्याची माहिती घ्यावी

ले आऊट मंजूरी पहा....

खरेदी करताना संबंधित प्लॉट किंवा फ्लॅटचे येणे व ले आऊट सक्षम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीचे आहेत का ते पहावेत आणि त्याबाबत काही शंका असल्यास किंवा खात्री करून घ्यायची असल्यास जिल्हाधिकारी किंवा महापालिका कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणे करून फसवणुक होणार नाही.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, नांदेड वाघाळा महापालिका.

खातरजमा झाल्यावर खरेदी करा .......

फ्लॅट किंवा फ्लॉट खरेदी करताना सर्वांनीच तहसील कार्यालयात महसूल तसेच नगररचना विभागाकडून मालकी हक्क व अकृषिक परवानगी याबाबतची खातरजमा करून घ्यावी. पूर्ण शहानिशा झाल्यानंतरच खरेदीचा व्यवहार करावा, म्हणजे फसवणुक होणार नाही.

- किरण अंबेकर, तहसीलदार, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT