nanded sakal
नांदेड

Nanded News : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवारी दुपारी विमानतळावर आल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी स्वागत केले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवारी (ता. पाच) दुपारी नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री पंकजा मुंडे सोबत होत्या. विमानतळावर आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

परळी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परळीकडे प्रयाण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT