Ardhapur Nagarpanchayat Election News esakal
नांदेड

अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेवर, दिग्गजांचा पराभव

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला तिसऱ्यांदा बहुमत मिळाले.

लक्ष्मीकात मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला तिसऱ्यांदा बहूमत मिळाले. १७ पैकी दहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रथमच कमळ फुलले असुन दोन उमेदवार विजयी झाले आहेत. एमआयएमच्या तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचा एक बंडखोर नगरसेवक विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नासेर खान पठाण, पप्पु बेग यांचा व भाजपचे नेते धर्मराज देशमुख यांच्या पत्नी मिनाक्षी देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. अर्धापूर नगरपंचायत (Ardhapur Nagarpanchayat Election) तिसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. (Congress Win Third Time Ardhapur Nagarpanchayat)

नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तहसील कार्यालयाच्या सभागृहात बूधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सकाळी सुरूवात झाली. मतमोजणीच्या चार फेऱ्यात झाल्या पहिल्या टप्प्यात एक ते नऊ तर दुसऱ्या टप्प्यात दहा ते सतरा प्रभागांची मतमोजणी (Nanded) झाली. नगरपंचायतीच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. काँग्रेचे शहराध्यक्ष राजू शेटे यांच्या पत्नी शालीनी शेटे, माजी उपनगराध्यक्षा डॉ पल्लवी लंगडे, सोनाजी सरोदे, छत्रपती कानोडे, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख, माजी नगरसेविका मिनाक्षी राऊत, गाजी काजी यांच्या आई काजी सायरा बेगम काजी सल्लाउद्यीन, नगरसेविका यास्मिन सुलताना, माजी सरपंच सलीम कूरेशी, नगरसेवक नामदेव सरोदे हे विजयी झाले आहेत. गेल्या पंचवीस वर्षात एकदाही पराभव न झालेले माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण, माजी सभापती पप्पु बेग यांचा पराभव झाला आहे. पप्पु बेग यांचा पराभव बंडखोर नगरसेवक मूख्तेदर खान पठाण यांनी करून सर्वांना धक्का दिला.

भाजपचे नगरपंचायतीमध्ये प्रथमच कमळ फुलले असुन ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद माटे यांच्या पत्नी कान्होपात्रा माटे या़ंचा विजय झाला. तसेच बाबुराव लंगडे हे प्रभाग क्रमांक दोनमधून विजय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जाकेर प्रभाग क्रमांक तीन मधून विजय झाले आहेत. त्यांनी विद्यमान नगराध्यक्षा सुमेरा बेगम यांचे पती शेख लायक यांचा पराभव केला आहे. एमआयएमने आपल्या जागेत वाढ केली असून तीन उमेदवार विजयी झाले आहेत. खमर बेगम शेख वल्ली महंमद, रोहिणी हिंगोले , मिर्झा शहेबाज करिमतुल्ला बेग हे विजयी झाले आहेत. एमआयएमचे दोन नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले असताना तीन नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे मिर्झा शहेबाज करिमतुल्ला बेग यांनी माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण यांचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT