conserve snake during celebrating nag panchami 2024 precaution while feeding milk to snake Sakal
नांदेड

Nag Panchami 2024 : संस्कृतीसोबतच नागांनाही जपा... नागाला दूध पाजणे ठरू शकते धोकादायक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शुक्रवारी (ता. नऊ) नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागांची पूजा करण्याची संस्कृती आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शुक्रवारी (ता. नऊ) नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागांची पूजा करण्याची संस्कृती आहे. या दिवशी नागांना दूध पाजण्याची प्रथा आहे. पण नागांना दूध पाजणे हे धोकादायक ठरु शकते. हे लक्षात घेतले पाहिजे. या उत्सवाला वैज्ञानिक आधार देखील आहे. या दोनही गोष्टींचा विचार करून नागांनाही जपले पाहिजे.

देशात सुमारे तीनशे नागाच्या जाती सापडतात. यातील ८० टक्के जातींचा मार्च-एप्रिल हा मिलन काळ असतो. मे महिन्यात ते अंडी घालतात. जून ते जुलै मध्ये पिले बाहेर पडतात. ठिकठिकाणी ते सर्रास दिसतात. भीती पोटी त्यांना मारले जाऊ नये म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा केली जात असल्याने एक प्रकारे त्यांना अभय मिळते.

भाजीही चिरत नाहीत अन् दूध पाजले जाते

नागपंचमीचा सण महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी महिला घरात भाजी देखील चिरत नाहीत. पण नागांना मात्र दूध पाजले जाते. नाग हा मांसाहारी आहे. त्याला दूध पाजल्यानंतर त्याच्या फुफ्फुसावर परिणाम होतो. यातून त्याचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे संस्कृती जपत असताना नागांना देखील जपण्याची गरज आहे.

दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. नागाला भाऊ समजून महिला या दिवशी पूजा करतात. नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी भावासाठी उपवास करतात.

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व काल अशा नऊ नागांचे चित्र पाटावर व भिंतीवर रक्तचंदनाने काढून अथवा छापील चित्राचे किंवा मातीच्या चिखलाचा पाच फण्याचा नाग तयार करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. नागदेवतेला दूध, लाह्या याचा नैवेद्य दाखवला जातो.

त्याच बरोबर वारूळाला जाऊन वारूळाची पूजा केली जाते. वारुळाला दूध, लाह्या समर्पण केल्या जातात. नागपंचमी हा सण नवीन लग्न झालेल्या मुलींकरिता खास असतो. सासुरवाशीण मुली माहेरी येतात. या निमित्ताने झोका, भुलई आदी खेळ खेळले जातात. शेतकरीसुद्धा या दिवशी जमीन नांगरणे, कोळपणे अशी शेतीचे काम करत नाही. नागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

माहेरवासीनी आल्या घरी...नागपूजनातून केली जाते कृतज्ञता व्यक्त

नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण! माहेरवासीनी खास या सणासाठी आल्या असून, बाजारपेठेतही खरेदीसाठी रेलचेल वाढली आहे. धार्मिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातूनही या सणाचे महत्त्व आहे.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळख असलेल्या सापाची पूजा यादिवशी केली जाते. हजारो किलो धान्याची नासाडी करणाऱ्‍या उंदरांना ते फस्त करतात, म्हणूनच हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो.

या सणाकडे माहेरवासीनी डोळे लावून असतात. नवविवाहितेला तिचा भाऊ या सणासाठी खास माहेरी आणतो, आजही परंपरा जपल्या जातात. झोक्याचेही तितकेच महत्त्व या सणांमध्ये आहे. नागपंचमीला नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. त्याला दुधाचा नैवेद्य दाखवितात.

काही ठिकाणी खऱ्या नागाची पूजादेखील केली जाते. मात्र, सर्पतज्ज्ञांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. नाग, साप दूध पीत नाही, तो पूर्णत: मांसाहारी जीव आहे. नागमणी, नागाच्या डोक्यावर केस इ. अंधश्रद्धा आहेत.

नाग डूख धरून, व्यक्ती लक्षात ठेवून पाठलाग करू शकत नाही. साप अमर नसतात. सापाची कात विषारी नसते; तसेच सामान्य नागरिकांनी साप बंदिस्त ठेवणे, हा गुन्हा आहे. ती परवानगी संबंधित औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन संस्थांना असते. दरम्यान, सजग शेतकरी शक्यतो धामण, दिवड, नानेटी इ. सहज ओळखता येणारे बिनविषारी साप ओळखून मारत नाही.

आठवडाभरात आढळले २२ बिनविषारी साप

पावसाळ्याची सुरवात झाली, तसे साप आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. पाऊस पडल्यामुळे सापांना राहण्यासाठी असणारी बिळे बंद झाल्यामुळे त्यांनी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे.

अशात मागील आठवडाभरात नांदेड व परिसरातून तब्बल २२ बिनविषारी, तर ६ विषारी साप प्राणिमित्र प्रसाद शिंदे यांनी पकडून मानवी वस्तीपासून दूर सुरक्षितरीत्या नेऊन सोडल्याची माहिती दिली. नांदेड परिसरात धामण, धुळनागिन, नानेटी, तस्कर, डुरक्या घोणस, गवत्या आदी बिनविषारी साप, तर विषारीमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे व पोवळा या जातींचे साप आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT