नांदेड : जिल्ह्यात गुरुवार (ता. ३०) पर्यंत जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या तब्बल एक लाख ४९ हजार २४२ लोकांचे सर्वेक्षण केले. यात कोरोना पाॅझिटिव्ह आढळेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील मृत्यू दर कमी असला तरी पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या अतीगंभीर आजारावर मात्र ८४६ रुग्णांनी मात केली. मात्र ७४ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. ही चिंतेची बाब असुन प्रशासनाच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बुधवार ता. २९ जुलै रोजी कंधार येथील ६५ वर्षाची एक महिला, देगलूर येथील ६८ वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे आणि वजिराबाद नांदेड येथील ४० वर्षाचा एक पुरुषाचा व गुरुवार ता. ३० जुलै रोजी नेरली नांदेड येथील ५० वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत पावले.आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ७४ एवढी झाली आहे.
हेही वाचा - महावितरण : नांदेड परिमंडळातील 174 तक्रार निवारण कक्षाव्दारे 26 हजार 140 ग्राहकांचे समाधान
आरटीपीसीआर तपासणीद्वारे
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये कलामंदिर येथील ४४ वर्षाचा एक पुरुष, वाडी येथील ६५ वर्षाची एक स्त्री, गितानगर येथील ७६ वर्षाचा एक पुरुष, बालाजीनगर येथील २२ वर्षाचा एक पुरुष, सोमेश कॉलनी येथील २१ वर्षाची एक स्त्री, शास्त्रीनगर येथील ५५ वर्षाची एक स्त्री, चौफाळा रोड येथील ४० वर्षाचा एक पुरुष, गाडीपुरा येथील ४० वर्षाचा एक पुरुष, वसंतनगर येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, गोवर्धनघाट येथील १४ वर्षाचा एक मुलगा, गणेशनगर येथील ३६ वर्षाची एक स्त्री, आनंदनगर येथील ३५ वर्षाचा एक पुरुष व ६५ वर्षाची एक स्त्री, मदिनानगर येथील ५८ वर्षाचा एक पुरुष, हडको येथील २९ वर्षाचा एक पुरुष, सिडको येथील ५२ वर्षाची एक स्त्री, वसरणी येथील १७ वर्षाचा एक पुरुष तर ३५, ७० वर्षाच्या दोन स्त्री, वाजेगाव येथील २३ वर्षाचा एक पुरुष असे नांदेड शहरातील बाधित आहेत.
येथील आहेत बाधीत
अर्धापूर येथील १२ वर्षाचा एक मुलगा, सगरोळी येथील १८ वर्षाचा एक पुरुष व ५५ वर्षाची एक स्त्री, कोलेबोर येथील ४० वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील ६८ वर्षाचा एक पुरुष, करेमलकापूर देगलूर येथील ४९ वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील ५० वर्षाचा एक पुरुष, भोईगल्ली येथील अनुक्रमे १४, २८ व ३१ वर्षाचे तीन पुरुष व ४५ वर्षाची एक स्त्री, लाईनगल्ली येथील १८, ४८ वर्षाचे दोन पुरुष व २५, २६, ६० वर्षाच्या 3 महिला, नागोबा मंदिर येथील ६८ वर्षाची एक स्त्री, ५०, ७२ वर्षाच्या दोन स्त्री, भाविदास चौक येथील ४३ वर्षाचा एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील ५२ वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील २८ वर्षाचा एक पुरुष, हदगाव येथील अनुक्रमे १५, १५, १७, २८, २४, ३०, ४७, ५० वर्षाचे नऊ पुरुष व २९, ३४, ४५, ५० वर्षाच्या चार महिला, तामसा येथील २९ वर्षाचा एक पुरुष व ३० वर्षाची एक महिला, कंधार येथील ७० वर्षाचा एक पुरुष, हात्तेपुरा येथील १९ व ७५ वर्षाचे दोन पुरुष, फुलवळ येथील २०, २९ वर्षाचे दोन पुरुष व ४८ वर्षाची एक स्त्री, फुलेनगर येथील ३४ वर्षाची एक स्त्री, पानभोसी येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, सोनखेड येथील ५७ वर्षाचा एक पुरुष, मंग्याल ता. मुखेड येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, मुखेड येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, वाल्मीकनगर येथील ३८ वर्षाचा एक पुरुष, नायगाव येथील ४०, ४९ वर्षाचे दोन पुरुष, नरसी येथील ५० वर्षाची एक स्त्री, कोकलेगाव येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, उमरी येथील ६७ वर्षाचा एक पुरुष, खुसदा पुर्णा येथील ४९ वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
अँटिजेन तपासणीद्वारे बाधित
अँटिजेन तपासणीद्वारे हैदरबाग येथील ६० वर्षाचा एक पुरुष, गोवर्धन घाट येथील ४० वर्षाचा एक पुरुष, बोरबन येथील १४, ३९, ४० वर्षाचे तीन पुरुष तर १३ व ३७ वर्षाच्या दोन स्त्री, कोसरनगर येथील २० वर्षाची एक स्त्री, कौठा येथील ३४ वर्षाचा एक पुरुष, जयभीमनगर येथील १३, २२, २५,२९,३०,४०,४५ वर्षाचे सात पुरुष व सहा, १६ ,१९, ३४, ३५, ४०,६० वर्षाच्या आठ महिला, मुखेड येथील १८ वर्षाचा एक पुरुष तर चार, २५, २९, ३६ वय वर्षाच्या चार महिला, नागसेननगर नांदेड येथील १२,१३,१४ वर्षाचे तीन पुरुष, राजनगर नांदेड येथील ३२ वर्षाचा एक पुरुष, चिखलवाडी येथील ३० वर्षाचा एक पुरुष व १०, ३४ वर्षाच्या दोन स्त्री, जेतवननगर येथील ४७ वर्षाचा एक पुरुष, महाविर सोसायटी येथील ७२ वर्षाचा एक पुरुष, हडको येथील ५० वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील ६२ वर्षाची एक स्त्री, दापका येथील आठ वर्षाचा एक पुरुष, भोकर येथील ५१ वर्षाची एक स्त्री हे बाधित आढळले.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- एक लाख ४९ हजार २४२,
घेतलेले स्वॅब- १३ हजार ७७६,
निगेटिव्ह स्वॅब- १० हजार८७६,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ११७,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-एक हजार ६८५,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- २२,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ५६,
मृत्यू संख्या- ७८,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-८४६,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-७४९,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २०२.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.