फोटो 
नांदेड

शिख बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन केला अंत्यसंस्कार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूंचा संसर्ग होईल या भितीपोटी रक्त संबंधातील नातेवाईक हीं अक्षरशः माणूसकी विसरून नातेवाईकांच्या दुःखाच्या वेळी पाठ फिरवत असले तरीही अश्या भयावह परिस्थितीत माणूसकीची भावना जोपासत आपुलकीने धावून येणारे देवदूत आजही पहावयास मिळतात. शहरातील अबचलनगर परिसरात रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचे दिर्घआजाराने बुधवारी (ता. २९) निधन झाले. मात्र त्याचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक समोर न आल्याने शिख समाजातील युवकांनी पुढाकार घेत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

शहराच्या अबचलनगर परिसरात नुकताच एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. या भागात कोरोना बाधीत व्यक्ती आढळल्याने येथील जिल्हा प्रशासनाने अबचलनगर हा परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित करुन संपूर्ण परिसर शील केला आहे. त्यामुळे मयत झालेल्या युलवकाच्या नातेवाईक घाबरुन समोर आले नाही. तसेच त्याचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासही येत नसल्याने शिख समाजातील सरदार अवतारसिंघ पहरेदार व ब्रिजप्रकाशसिंघ नेहंग यांनी मानुसकीचे नाते जोपासत स्वतः पुढाकार घेऊन मयत युवकाचा अंत्यसंस्कार हिंदु धार्मिक रितीरीवाजाप्रमाणे करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांच्या मदतीने अनेक शिख बांधव धावून आले.

महानगरपालिकेचाही पुढाकार

नांदेड महानगरपालिकेच्या सहाय्याने पुढाकार घेऊन गोवर्धनघाट येथे त्या युवकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी नांदेड महानगरपालिकेचे नगरसेवक सरदार विरेंद्रसिंघजी गाडीवाले व सहाय्यक आयुक्त शुभम क्यातमवार व सादिक भाई, गोविंद थेटे, खमर भाई तसेच स्वर्गरथ चालक या सर्वांनी मिळुन अवघ्या दोन तासामध्ये अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहीत्य तात्काळ उपलब्ध करून दिले.

गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंत्यसंस्कार 

कोरोना व्हायरससारख्या या भयंकर महामारीच्या परिस्थितीत रक्त संबंधातील नातेवाईकांनी साथ सोडली तरीही माणूसकीचे नाते जोपासणारी लोक आज या दुः खाच्या परिस्थितीत मयताच्या कुटुंबाच्या मदतीला अक्षरशः देवदूताप्रमाणे धावून आले. कोरोना विषाणूंच्या दहशतीसमोरही छातीठोकपणे उभे टाकून माणूसकीचे नाते जोपासणाऱ्या या देवदूतांचे शहरभर कौतुक होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT