Cyber Crime Youth trapped in online loans Blackmailing after repayment crime news nanded sakal
नांदेड

Cyber Crime : तरुणाई अडकली आॅनलाइन कर्जाच्या विळख्यात

परतफेडीनंतरही ब्लॅकमेलिंग : परराज्यात बसून घातला जातोय गंडा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बॅंक, पतसंस्थेकडे कर्ज घेण्यास गेल्यास कागदपत्रांची पूर्तता करताना नाकी नऊ आणले जाते. खासगी व्यक्ती (सावकार) पाच ते दहा हजार रुपयांचे कर्ज देताना कोरे धनादेश घेतात. तर दुसरीकडे आॅनलाइन कर्ज देताना कुठल्याही कागदपत्रांची मागणी न करता केवळ अॅप्लिकेशन डाउनलोड करायला लावून तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढले जाते. त्या आॅनलाइन कर्जाची परतफेड केल्यानंतर ब्लॅकमेलिंग करून वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

मोबाईल अॅपवर कर्ज देण्याचा सतत मॅसेज पाठविला जातो. सहज कर्ज मिळत असल्याने खासकरून तरुण त्याला बळी पडत आहेत. मात्र, येथूनच ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत येत आहे. बदनामीच्या भीतीने मनमानी रक्कम अदा करूनही पैसे वसुलीचा तगादा सुरुच राहत असल्याने अनेक कुटुंब दहशतीच्या सावटात वावरत आहेत. आॅनलाइन कर्ज घेताना फ्राॅडर्सकडून अॅप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले जाते. संबंधित गरजू तत्काळ कोणतीही खातरजमा न करता अॅप्लिकेशन डाउनलोड करतो. यावेळी आपल्या मोबाइलमधील अॅक्सेसवर फ्राॅडर्स ताबा मिळवितात. कर्ज तर मिळते, ठराविक कालावधीत ते परतही केले जाते. त्यानंतरही वसुलीचा तगादा लावला जातो.

गॅलरी व काॅन्टॅक्ट लिस्टमधील क्रमांकावर अश्लील छायाचित्र पाठवून वेठीस धरले जाते. मोबाइलमधील फोटो गॅलरीचा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी सायबर चोरट्यांकडून वापर केला जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी फ्राॅडर्सकडून अवास्तव पैशाची मागणी केली जाते. परराज्यात बसून हा ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा चालत आहे. त्यामुळे कुणी सहज आॅनलाइन कर्ज देण्याचे आमिष दाखवित असेलतर त्यावर विश्वास ठेवू नये. अन्यथा फसवणुकीचा हा फास असाच वाढत जाण्याची भीती आहे.

वेळीच व्हा सावधान

मोबाइलवर दिवसभरात विविध मॅसेज येतात. कर्ज घेण्यासाठी तरुण अगदी पुढे येतात. सायबर चोरट्यांसाठी तरुणाई साॅफ्टटार्गेट ठरत आहेत. एकच नव्हे तर दहा ते वीस अॅप्लिकेशनवरून कर्ज घेण्यापर्यंत मजल जात आहे. यातच कर्जवसुलीतून ब्लॅकमेलिंगचा फंडा अवलंबल्या जात आहे.

आजच्या तारखेत कुणीही सहज कर्ज देत नाही, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. बॅंका, पतसंस्था येथूनच विश्वासाने कर्जाचे व्यवहार करावेत. आॅनलाइन कर्ज घेताना सावधगिरी अधिक बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक ओपन करून अॅप्लिकेशन डाउनलोड करण्याचे टाळावे.

- अविनाश सोनवणे, निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सायबर सेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT