क्राईम न्यूज 
नांदेड

खंजरचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद; सव्वा लाखाचा मुद्देमाल केला जप्त- वजिराबाद पोलिसांची कारवाई

या दरम्यान रेल्वे स्टेशनकडून शासकीय रुग्णालयाकडे एका विना नंबरच्या दुचाकीवरुन ट्रिपल सीट येणाऱ्या संशयितांना त्यांनी थांबविले. त्यांची विचारपुस केली असता तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या विविध भागात एकट्या व्यक्तींना किंवा सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्यांना गाठून खंजरचा धाक (Knife shoews) (wajirabd police) दाखवून लूटमार करणारी टोळीने डोके वर काढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र पोलिसांनी या टोळीतील काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या (accused arest) असून तीन जणांना अठक केली. त्यांच्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ती कारवाई वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ता. सात मे रोजी केली. Dagger robbers arrested; One and a half lakh worth of property confiscated - Wazirabad police action

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या पथकाला कार्यरत केले. वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या विरुद्ध जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी आपले सहकारी श्री जाधव, विजय नंदे, बबन बेडगे, संजय जाधव, गजानन किडे, मनोज परदेशी बबन बीडजे, बालाजी कदम, संतोष जेलरोड, शरदचंद्र चावरे, चंद्रकांत बिरादार, वेंकट गंगुलवार यांना सोबत घेऊन आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरु केली.

हेही वाचा - कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करा; अन्यथा काळ्या यादीत टाकू- अशोक चव्हाण

या दरम्यान रेल्वे स्टेशनकडून शासकीय रुग्णालयाकडे एका विना नंबरच्या दुचाकीवरुन ट्रिपल सीट येणाऱ्या संशयितांना त्यांनी थांबविले. त्यांची विचारपुस केली असता तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नाही तर त्यांची वर्तणूक पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांची अंगझडती घेतली. यावेळी अंगझडतीमध्ये चोरलेले दोन मोबाईल मिळून आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीपोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्यामध्ये रोशन सुरेश हाळदे (वय १८) रा. गोविंदनगर, गुलाब राजूब प्रधान (वय २२) रा. आंबेडकरनगर आणि जयराज शिवराज कंधारे (वय १८) रा. शिवनगर नांदेड यांचा सहभाग आहे.

या चोरट्यांनी ता. एक मे रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास बायपास रोडवरील सामाजिक न्याय भवन समोरील रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या दोन इसमांना खंजरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी व दोन मोबाईल जबरीने चोरले होते. हे दोन्ही मोबाईल त्यांनी पोलिसांना दिले. तर सोन्याच्या अंगठी तिसऱ्या आरोपीकडून जप्त करण्यात आली. मुरलीधर ज्ञानेश्वर कटकर राहणार गांधीनगर यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात या तिनही चोरट्यांना घेतले असून त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिन्ही आरोपींना विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT