nnd11kjp01.jpg 
नांदेड

जिल्ह्यातील लॉकडाउनसंदर्भात मंगळवारी घेणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा चालू करण्यासंदर्भात दिवस आणि वेळ ठरविण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन मंगळवारी (ता. १२) निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबतच शासनाच्या नवीन निर्देशानुसार कोरोना बाधीत रुग्णाचा पहिला व दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर  त्याला दहा दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगीतले.

झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता. ११) जिल्ह्यातील पत्रकारांसोबत झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कोरोना प्रतिबंध संदर्भात केलेल्या उपाययोजना आणि एकूणच पत्रकारांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन ऑनलाइन संवादाच्या माध्यमातून केले. प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पत्रकारांसोबत आणि पत्रकारांनीही प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत ऑनलाईन संवाद साधला. महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ उपस्थित होते. यात ७२ पत्रकारांनी ऑनलाइन संवादाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. 

लॉकडाउनमध्ये शिथीलता देणार  
जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथीलता देवून शहर तसेच ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. यात व्यवहार सुरु करण्यासाठी दिवस तसेच वेळ ठरविण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शहरापेक्षाही ग्रामिण भागात अधीक शिथीतला देण्याचे काम होणार. शासनाच्या नवीन निर्देशानुसार कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाचा पहिला व दुसरा स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना त्यानंतर दहा दिवसात घरी सोडण्यात येणार आहे. पूर्वी हा कालावधी २८ दिवसाचा असायचा, असे ते म्हणाले. गुरुव्दारा परिसरातील यात्रेकरु तसेच कर्मचारी असलेल्या चारशे लोकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. या भागातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे ते म्हणाले. 

कामाशिवाय घराबाहेर पडू नये
अद्यापही कामाशिवाय घराबाहेर पडू नये. वृद्ध व लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पुर्नरबांधणीसाठी शहरातील बॅरिकेट्स हटविण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी तसेच कंटेनमेंट झोनमध्ये बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. सध्या शहरात सात तर एक ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन आहे. 

सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम 
जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांवर एनआरआय भवन, आयुवेर्दीक रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. आजपर्यंत केवळ एका रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले होते. रुग्णालयात पंचवीस व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. दहा वेंटीलेटरची मागणी केली आहे. तर तीन खासगी रुग्णालयाचे वेंटीलेटर ताब्यात घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील रोज शंभर ते दिडशे नमुने तपासण्यात येत आहेत. या लॅबमध्ये आतापर्यंत दोन हजार ७९ नमुने तपासण्यात आले. या ठिकाणी शासनाकडून मिळालेल्या टेस्टींग उपलब्ध आहेत. तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासणी होत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील बाहेर राज्यातील नागरिकांना एसटीव्दारे स्वगृही पाठविण्यात येत आहे. बाराशे प्रवाशी झाले तर रेल्वे सोडता येइल. कृषी संदर्भाल आस्थापणा सुरु करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

कर्जमाफीच्या याद्या आल्या पण....
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्याने पीककर्ज वाटपाचे काम रखडल्याच्या प्रश्नावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कर्जमाफीच्या याद्या आल्या आहेत. परंतु त्यासाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने शासनाच्या निर्देशानुसार त्या प्रसिद्ध केल्या नाहीत. पीककर्ज वाटपाबाबत बॅंकांची बैठक घेऊन लवकरच कर्ज वाटपाचे काम केले जाइल, असे डॉ. विपीन यांनी सांगीतले. वाळू उपसा, महिला पोलिस कर्मचारी, मुख्यालयी न राहणारे कर्मचारी आदी विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT