corona sakal
नांदेड

नांदेड : कोरोनाच्या रूग्ण संख्येत घट

दोन दिवसात सहाशेचा टप्पा ओलांडलेली रूग्ण संख्या ४२० वर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रशासनाच्यावतीने कोरोना प्रतिबंधात्मक (Corona)उपाययोजना राबविताना त्याला लाभलेली नागरिकांचा साथ या मुळे गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट तशीच कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच दैनंदिन कोरोनाबाधितांचा(corona patient) आकडा एखाद दुसरा दिवस वगळता कमी संख्येवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र असे काहीसे समाधानकारक चित्र असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वोतोपरी काळजी घेण्याची गरज आहे. नांदेडकरांनी (Nanded)काळजी घेतली नाही तर विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो हे तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार २५३ अहवालापैकी ४२० अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९४ हजार २०५ एवढी झाली असून यातील ८८ हजार ५८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला दोन हजार ९६६ रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड पालिका २९६, नांदेड ग्रामीण ४३, भोकर दोन, देगलूर दहा, धर्माबाद १३, हिमायतनगर एक, कंधार दोन, किनवट २२, लोहा दोन, मुदखेड दोन, मुखेड पाच, नायगाव एक, उमरी दोन, बिलोली दोन, अर्धापूर तीन, परभणी दोन, उदगीर चार, हैदराबाद एक, यवतमाळ एक, वर्धा एक, जयपूर एक, हिंगोली तीन व मुंबई एक असे एकूण ४२० कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी दोन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १६४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड तीन, खाजगी रुग्णालय सहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण २६ कोरोना अशा २०१ बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज दोन हजार ९६६ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी २९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल सात, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६०१, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण दोन हजार ३०९, खाजगी रुग्णालय १७, हदगाव एक, बिलोली दोन अशा एकूण दोन हजार ९६६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  • पॉझिटिव्ह - ९४ हजार २०५

  • कोरोनामुक्त - ८८ हजार ५८४

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६५५

  • सोमवारी पॉझिटिव्ह - ४२०

  • सोमवारी कोरोनामुक्त - २०१

  • सोमवारी मृत्यू - शून्य

  • उपचार सुरु - दोन हजार ९६६

  • अतिगंभीर प्रकृती - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT