Temperature sakal
नांदेड

Diarrhea Patients : अतिसार रुग्णांमध्ये वाढ! तापमानवाढीने खासगी, शासकीय रुग्णालयांत गर्दी

नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून पारा ४० अंशांच्या पुढे आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून पारा ४० अंशांच्या पुढे आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असून अतिसार, उष्माघात, डिहायड्रेशनच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात जवळपास २० ते २५ टक्के रुग्णसंख्या ही अतिसाराची असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली आहे. जिल्ह्यामध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यातच गेला आठवडाभर दुपारपर्यंत अंगाची लाही-लाही करणारे ऊन आणि त्यानंतर पाऊस असे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून, रुग्णांमध्ये डिहायड्रेशन, अतिसार, उलटी, उष्माघात, ताप, हात-पाय गळून जाणे व अशक्तपणा जाणवणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात ऋतुबदल होत असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हवामानात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होत आहे.

विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले की तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. यामध्ये ताप, अंगदुखी यांसह श्वसनाच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या दिसून येत आहे. अशा वेळी आहारावर, दैनंदिन वेळापत्रकावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड पेय, आंबा यावर ताव मारला जात आहे.

काय केले पाहिजे ?

सर्वसाधारपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हवं. फळं, फळांचा रस प्यायला पाहिजे, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. उन्हाळ्यामध्ये दिवसातून एक ते दोन वेळा शहाळ्याचं पाणी किंवा लिंबू पाणी प्यावं. एक ग्लास पाण्यामध्ये साखर, चिमूटभर मीठ आणि ओआरएस टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होतं.

कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दही किंवा ताकाचा आहारात समावेश करावा.

सध्याच्या उन्हाच्या कडाक्यामुळे, तसेच सततच्या ऋतुबदलामुळे रुग्णांच्या संख्येत २०-२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात बाहेर पडत असताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे आणि दिवसभरात ८-१० ग्लास पाणी पिलेच पाहिजे. आणि यासंबंधी त्रास झाल्यास नजीकच्या रुग्णालयात यावर उपचार घेतले पाहिजे.

- डॉ. सूरज शिंदे, जनरल फिजिशियन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT