NND08KJP02.jpg 
नांदेड

मोफत तूरडाळ, चनाडाळीचे वितरण सुरु

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना एप्रील, मे व जूनसाठी अन्‍नधान्‍याचे दिलेल्‍या नियमित नियतनानंतर अंत्‍योदय आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह एक किलो डाळ या परिमानात (तूरडाळ व चनाडाळ या दोन्‍हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) पॅाश मशीनद्वारे मोफत वाटप होणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी स्वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी केले आहे.  

प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजूर
जिल्‍ह्यातील १६ तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील चार लाख दहा हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना या येाजनेंतर्गत मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजुर करण्‍यात आली आहे. मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. याबाबत संबंधित तहसिलदार तसेच स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना नमूद जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्‍यांना डाळ वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आली आहे.ह

नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना एप्रील, मे व जून या तीन महिन्‍याचे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात या दाळीचे मोफत वितरण सुरु होणार आहे. सध्‍या जिल्‍ह्यातील नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत डाळीचे वितरण सुरु होणार आहे.

२७ हजार २२६ मेट्रीक टन दाळ उपलब्ध
एप्रील साठीच्‍या एका महिन्‍याची डाळ वाटप मे महिन्‍यामध्‍ये करण्‍यात येणार असून मे व जूनच्‍या डाळीच्या वाटपाबाबत नंतर स्‍वतंत्ररित्‍या कळविण्‍यात येईल. नांदेड जिल्‍ह्यात एकूण एक हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदार असुन या सर्व रास्‍त भाव दुकानदारांना सर्व योजनेचे मे साठी २७ हजार २२६ मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे 

१३ हजार २७० मेट्रीक टन धान्‍य वाटप
जिल्‍ह्यात बुधवारपर्यंत (ता. २०) मे महिन्याचे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण एक हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदाराकडुन अंत्‍योदय योजनेत दोन हजार ६६१, प्राधान्य कुटूंब योजनेचे आठ हजार १८२, एपीएल केशरी (शेतकरी) योजनेचे एक हजार ८२१ आणि एपीएल केशरी (एनपीएच) ६०६ असे एकूण १३ हजार २७० मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्‍य वाटप झाले असून प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना चार हजार ५९२ मेट्रीक टन मोफत तांदुळ वितरण करण्‍यात आला आहे.

लाखाच्‍या आत उत्‍पन्‍न असणाऱ्यांना सुविधा
राज्य अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभागाचा शासन निर्णयानुसार शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक कौटुंबीक उत्‍पन्‍न एक लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी माहे मे व जून या दोन महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रति महिना प्रति व्‍यक्‍ती तीन किलो गहु (आठ रुपये प्रति किलो प्रमाणे), व तांदुळ दोन किलो (१२ रुपये प्रति किलो प्रमाणे) दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT