File photo 
नांदेड

जिल्हा बॅंक निवडणुक : हेलिकाॅप्टर व रोड रोलरचे भवितव्य मतपेटीत बंद; 97.98 टक्के मतदान

शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ पैकी १८ जागेसाठी शुक्रवारी (ता. दोन एप्रिल) १५ तहसिल कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर मतदान झाले. दिवसभरात 97.97 टक्के मतदान झाले असून,  मतदान झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये ९४० पैकी 921 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत महाआघाडी प्रणीत ‘समर्थ’ सहकार पॅनल व भाजप प्रणीत सहकार ‘विकास’ पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. महाआघाडीचे नेतृत्व पालकमंत्री अशोकराव चव्हाण तर भाजपाचे नेतृत्व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे करीत आहेत. उभय नेत्यांनी या निवडणूकीत आपली राजकीय शक्ती पणाला लावल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 

जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकूण ९४० इतकी मतदार संख्या असून त्यात ७९५ पुरुष तर १४५ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी दिवसभरात 141 महिला आणि 780 पुरुष अशा एकूण 921 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणूकीत २१ पैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडले गेले असून अन्य १८ जागांसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. 
 
तालुकानिहाय मतदान असे
 

तालुका एकूण टक्केवारी
मुदखेड 95.45
अर्धापूर 96.55
कंधार 100
लोहा 97.18
बिलोली 96.83
नायगाव 97.59
देगलूर 97.83
धर्माबाद 100
हदगाव 100
भोकर 100
उमरी 92.73
मुखेड 100
किनवट 98.57
माहुर 100
नांदेड 97.81
एकूण 97.98

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT