crime  sakal
नांदेड

Nanded News : दोन घटनेत दरोडे टाकणाऱ्या सहा जणांना दुहेरी जन्मठेप

न्यायालयाचा निकाल; एक लाख २० हजाराचा दंड

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दोन दरोडे टाकणाऱ्या सहा जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर यांनी दुहेरी जन्मठेप आणि प्रत्येकाला २० हजार रुपये दंड याप्रमाणे एकूण एक लाख २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ता. आठ जुलै २०२० रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आकाश हा आपल्या भावासोबत दुचाकीवर लालवाडी तांडा (ता. कंधार) येथून झुनझुनवाडीकडे (ता.कळमनुरी) जात होता.

त्यावेळी नांदेड - सोनखेड रस्त्यावर लक्की पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकीवरील दरोडेखोरांनी त्याच्या भावावर चाकुने हल्ला करून जखमी केले होते. त्यांच्या जवळून विविध साहित्यासह अडीच हजार रूपये रोख रक्कम लुटली होती. अशीच एक दुसरी घटना ता. नऊ जुलैच्या मध्यरात्री एक वाजता घडली.

याबाबत देगलूर नाका येथील रहिवासी भाजीपाला व्यापारी चांद पाशा अब्दुल हफीज यांनी देखील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हिरवी मिरची भरलेला टॅम्पो मुसलमानवाडी ते विद्यापीठ रस्त्यावरून येत असताना टेम्पो खराब झाला म्हणून दुसऱ्या टेम्पोमध्ये मिरचीचे पोते भरताना सहा चोरट्यांनी खंजीरचा धाक दाखवून चालकाच्या खिशातील आणि गाडीच्या डिक्कीमधील ५५ हजार १५० रुपये लुटले होते. या प्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात, गोविंद खैरे, शेख असद यांनी तपास करून विकास सुभाष हाटकर, राजेंद्र उर्फ राजू हंबर्डे, प्रभाकर चिमनाजी थोरात, ईश्वर मारोतीराव हंबर्डे, दत्ताहरी हंबेर्डे, अनिकेत नाईकराव हंबर्डे या सहा जणांची नावे निष्पन्न केली. यातील काही आरोपी दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत फरार होते. नंतर त्यांच्या विरुध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात एकूण १५ साक्षीदारांनी जबाब नोंदवला. उपलब्ध पुरावाआधारे न्यायाधीश बांगर यांनी दोन दरोडे टाकणाऱ्या या सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकास २० हजार रुपये रोख दंड असा एकूण दोन प्रकरणात एक लाख २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता रणजित देशमुख, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनुराधा कोकाटे यांनी बाजू मांडली. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी आणि चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT