नांदेड - बेवारस अवस्थेत शहरात फिरणाऱ्या व्यक्तींना ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट उपक्रम सुरू केला आहे. आत्तापर्यंत पंधरा महिन्यात साडेपाचशेपेक्षा जास्त भणंग अवस्थेत फिरणा-यांची कटिंग, दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व प्रत्येकी शंभर रुपयाची बक्षिस देण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. सहा) भ्रमिष्ट अवस्थेत फिरणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरचे मन परिवर्तन करून स्वखर्चाने लुधियाना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पाठवून घरवापसी केली आहे.
भाजप महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने ॲड. ठाकूर हा उपक्रम राबवित आहेत. सोमवारी एक व्यक्ती इंग्रजीत स्वतःच्या मनाशी पुटपुटत असल्याचे निदर्शनास आले. त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली असता तो लुधियाना जिल्ह्यातील जल्ला या गावचा असल्याचे कळाले. तो स्वतः एमबीबीएस डॉक्टर असून त्याची पत्नी सुद्धा अमृतसर शासकीय रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहे. दोघात बनाव झाल्यामुळे घटस्फोटाचा खटला सुरू आहे. या घटनेचा विपरीत परिणाम डोक्यावर होऊन गेल्या सहा महिन्यापासून डॉ. चमनसिंग हे नांदेडमध्ये बेवारस अवस्थेत फिरत होते.
त्यामुळे दिलीप ठाकूर यांनी त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला पण तिने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांच्या आई प्रीतमकौर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर योग्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लुधियाना येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीपसिंघ यांना माहिती देऊन सदर डॉक्टरांना रेल्वे तिकीट काढून व खर्चासाठी पैसे देऊन सचखंड एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. आजूबाजूच्या प्रवाशांना व तिकिट निरीक्षक (टीसी) यांना त्यांची माहिती देऊन रस्त्यात कुठेही उतरू देऊ नका, यासाठी लक्ष ठेवण्याची विनंती केली. त्यांना घेण्यासाठी लुधियाना रेल्वेस्थानकावर कुलदीपसिंघ हे स्वतः उपस्थित राहून डॉक्टरांना त्यांच्या मूळ गावी नेऊन सोडणार असल्याची माहिती श्री. ठाकूर यांनी दिली आहे.
उपक्रमासाठी यांची झाली मदत
शहरातील सर्व रस्त्यावर फिरून अरुण काबरा, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, संजयकुमार गायकवाड यांनी आपल्या वाहनावर ध्रमीष्ठाना बसवून आणले. स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली. स्नानासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. चिरंजीलाल दागडिया, ओमकार यादव, बालाजी जाधव, संजयकुमार गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाला आकाशवाणी उद्बोधक राजीव मिरजकर, गीता परिवाराच्या नीता दागडिया, डॉ. प्रकाश शिंदे, अशोक राठी यांनी सदिच्छा भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.