PM kisan kyc esakal
नांदेड

जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली

पीएम-किसानच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकासोबत संलग्न करून घेण्याची गरज आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी पीएम किसान संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख ६१ हजार ५३२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे.

दरम्यान ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी-कधी वेबसाईट खुलत नाही तर कधी कागदपत्र डाऊनलोड होत नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचाही वारंवार अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

अशी आहे स्थिती

जिल्ह्यातील दोन लाख ७९५ शेतकरी लाभाऱ्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक १८ हजार ८७६ शेतकरी हदगाव तालुक्यातील आहेत. मुखेड तालुक्यातही १८ हजार १८५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया अद्यापही पूर्ण केलेली नाही. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जावून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी.

तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी

अर्धापूर १४,२४३

भोकर २३,९४३

देगलूर ३०,२९७

धर्माबाद १५,२५८

हदगाव ४६,९२६

हिमायतनगर २०,३०२

कंधार ४७,०४३

किनवट ४१,३६२

माहूर १६,५९८

मुदखेड १७,४४६

मुखेड ४५,२४१

नायगाव ३१,७११

नांदेड १९,४८७

उमरी १९,०२३

बिलोली २६,२८५

लोहा ४७,१६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT