Nanded Loksabha Constituency  sakal
नांदेड

Nanded Loksabha Constituency : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न ; जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंग बाधला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंग बाधला आहे. येत्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करण्यात येत असून यंदा ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शहरासह जिल्ह्यात मतदान जनजागृतीवर भर देण्यात येत आहे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील विशेष नियोजन केले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आढावा घेतला असता २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी ५३.८३ टक्के होती. २०१४ मध्ये ही टक्केवारी ६०.०१ टक्का झाली तर २०१९ मध्ये ६९.०५ टक्के मतदान झाले. आता २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी विशेष लक्ष दिले आहे. स्वीप कक्षाच्या माध्यमातून मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नांदेड शहरासाठी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे तर ग्रामिण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इको फ्रेंडली मतदान केंद्र तयार करण्यात येत आहेत. शिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदारांसाठी स्वागत कक्ष आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न

ज्या ठिकाणी मतदान अत्यंत कमी झाले अशा ठिकाणांची नोंद घेऊन त्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, माध्यमांचा वापर, प्रत्यक्ष भेटी, गृह संवाद अशा विविध उपक्रमातून कक्षाचे सदस्य कार्यरत. दुर्गम भागातील गावांना भेट देऊन जनसंवाद कार्यक्रम. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सुटी देण्याबाबत संबंधित आस्थापनांच्या मालकांना भेटून विनंती. स्थलांतरामुळे जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांना गावात आणण्यासाठी उपाययोजना. महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा सहभाग. तसेच प्रतिज्ञा, रिंगण, पथनाट्य, आई - बाबांना संकल्प पत्र, भटक्यांच्या पालांच्या ठिकाणी भेटी, लग्नकार्यात तसेच धार्मिक स्थळी आवाहन, सामाजिक माध्यमे, छोटे व्हिडिओ तयार करून रंजकपणे माहिती देणे, घोषवाक्य आदी तयारी करण्यात येत आहे.

निवडणुकीत सर्वांनी मतदान केले पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून मतदारसंघात ८० टक्क्याच्या वर मतदार मतदान करतील, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे तेथे लोकमाध्यमे, सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष संवादातून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी.

नवमतदार युवक, युवती मतदान करण्यासाठी उत्साहीत असतात. त्यांच्यातील उत्साहाला बळ देण्यासाठी महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था, तरुणांचे सामाजिक संघटन आदींना यात सहभागी करून घेण्यात येत आहे. तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांचाही सहभाग घेऊन मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- मीनल करनवाल,

मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT