ex man 
नांदेड

शासकिय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेची प्रदेश कार्यकारीणीची निवड

शासनमान्य असलेली माजी सैनिक कर्मचारी यांची ही संघटना कर्मचारी यांच्या हितार्थ 2011 पासुन कार्यरत आहे. संघटनेच्या प्रयत्नातून माजी सैनिक कर्मचारी यांची वेतननिच्छीती आदेश मिळाले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शासकिय पुर्ननियुक्त माजी सैनिक (Ex man orgnaisation) राज्यसंघटनाची त्रैवार्षिक निवडणूक ता. आठ मे रोजी ऑनलाईन पध्दतीने पुर्ण झाली. दिनांक 25 एप्रिल 2021 पासुन निवडणूक प्रक्रीया ऑन लाईन पध्दतीने (online election) सुरु झाली होती. ता. आठ मेरोजी झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी बाजीराव गंगाराम देशमुख, सांगली, उपाध्यक्ष राजीव हरी जामोदकर, जळगांव, स‍रचिटणी संतोष दिवाकर मलेवार, नागपूर, चिटणीस दिपक रतन पाटील, पुणे यांची निवड करण्यात आली. Election of State Executive of Government Re-appointed Ex-Servicemen's Association

शासनमान्य असलेली माजी सैनिक कर्मचारी यांची ही संघटना कर्मचारी यांच्या हितार्थ 2011 पासुन कार्यरत आहे. संघटनेच्या प्रयत्नातून माजी सैनिक कर्मचारी यांची वेतननिच्छीती आदेश मिळाले आहे. ज्यामुळे सैन्यात घेत असलेले वेतन त्यांना महाराष्ट्र शासन प्रदान करत आहे, तसेच बदली मधे प्राधाण्यक्रम, असे विविध लाभ माजी सैनिक कर्मचारी यांना संघटनेमुळे मिळत आहेत. अशा या कर्मचारी यांच्यासाठी महत्वाची व प्रतिष्ठित असलेली संघटनेची निवडणूक महत्वाची मानली जाते. कोरोना-19 प्रादुर्भाव मुळे संघटनेची निवडणूक हि सतत पुढे ढकलण्यात येत होती, अखेर राज्यकार्यकारीणी यांनी ऑनपद्वतीने निवडणूक घेण्याची जवाबदारी नांदेड चे संघटनेचे प्रमुख सल्लागार कमलाकर शेटे यांच्यावर सोपविण्यात आली होती, ता. 25 एप्रिलपासुन ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज वापसी व ऑनलाईन मतदान असे टप्याटप्याने झालेली हि प्रक्रीया चता. आठ मे रोजी संपन्न झाली. पाच जागेसाठी 10 अर्ज प्राप्त झाले होते, निवडणूकमधे दोन पॅनल तयार झाले होते.

हेही वाचा - हदगाव वनक्षेत्रात तो नसण्याची खात्री झाली. तालुका वनक्षेत्रामध्ये पहिल्यांदाच रानगवा आढळल्याची नोंद या घटनेनंतर झाली आहे

संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखरजी आलेगांवकर, नागपूर व सरचिटणीस प्रकाश कुलकर्णी, औंरगाबाद यांनी परत निवडणूक न लढविण्याची व युवा संघटना सदस्यांना नेतृत्व करण्याची भुमिका घेतली व सांगली येथील बाजीराव गंगाराम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील टिमला पाठींबा दिला होता. यामुळे उपरोक्त पदाधिकारी यांची निवड भरघोस मताधिक्यने करण्यात आली.

कर्मचारी संघटनेच्या इतिहासात प्रथमच सुरळीतपणे ऑनलाईन निवडणूक प्रक्रीया प्रथमतहा यशस्वी झाल्याने व नांदेड येथून ही प्रक्रीया पार पाडल्याने सर्व संघटना व कर्मचारी याबाबत कुतूहालाने पाहत अभिनंदन करत आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून नांदेडचे माजी सैनिक वकील सार्जेंट व्यंकटेश गोळेगांवकर तर सहा निवडणूक अधिकारी माजी सैनिक जेसीओ ईश्वर नारायण डोम यांनी कार्य केले, तसेच तांत्रीक मदत स्थानिक संगणक तज्ञाकडून घेण्यात आली.

ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी कमलाकर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय समितीची गठण करण्यात आली होते. यामधे नागपूरचे सार्जेन्ट सुधाकर तकीत, पुणे येथील नेव्ही अधिकारी शादीवान दिलावर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT