बाऱ्हाळी (जि.नांदेड) : विधानसभेच्या मुखेड (जि. नांदेड) मतदारसंघाचे (Mukhed MLA) माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नागनाथराव सटवाजी रावणगावकर (वय ७२ ) (Former MLA Nagnathrao Rawangaonkar) यांचे हृदयविकाराने सोमवारी (ता. दोन) सकाळी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. नागनाथराव रावणगावकर यांचा जन्म चार जानेवारी १९५० रोजी रावणगाव (ता. मुखेड) येथे झाला. १९७४ मध्ये ते नांदेड (Nanded) जिल्हा परिषदेच्या मुक्रमाबाद गटाचे सदस्य झाले. १९७४ ते १९७९ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती म्हणून काम पाहिले.
१९७९ मध्ये ते जांब गटातून निवडून आले. १९७९ ते १९८१ पर्यंत पुन्हा ते समाज कल्याण सभापती झाले. १९८० मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदकडून विधानसभेच्या मुखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. याच काळात त्यांची महात्मा फुले विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९८० ते १९८५ पर्यंत ते अध्यक्ष होते. १९८५ ते २०१० पर्यंत मुखेडच्या खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष होते. १९९५ ते २००० दरम्यान गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. शरद पवार यांचे ते सच्चे, एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.