NND16KJP01.jpg 
नांदेड

शेतकऱ्यांना थेट बांधावर मिळाली सुविधा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी नये यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना बांधावर निविष्ठा पुरवित आहे. कंधार तालुक्यातील आत्मा अंतर्गत नोंदणी झालेले गट व गावातील शेतकऱ्यांना थेट बांधावर निविष्ठा पुरवण्यात येत आहेत. बिजेवाडी (ता. कंधार) येथील वसंतराव नाईक शेतकरी गटाला कृषी निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार येथे शनिवारी (ता. १६) करण्यात आला.

वीस टन खताचा पुरवठा  
यावेळी या चार गटातील एकूण ७० शेतकऱ्यांना २० टन रासायनिक खते व बियाणे २१ क्विंटल बियाणे थेट बांधावर विक्री करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी नागोराव आंबुलगेकर, विकास नरनाळीकर, पवनसिंह बैनाडे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकासह शेतकरी उपस्थित होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन खबरदारी घेण्यात आली. शेतकरी तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क बांधून सुरक्षित अंतर राखण्यात आला. यावेळी कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टरचलीत औजारांची पाहणी बहाद्दरपुरा येथे केली. यावेळी शिवाजी गणपती पेठकर यांनी खरेदी केलेल्या रोटाव्हेटरची पाहणी केली.

हवामान खात्याच्या अंदाजामुळे आशा पल्लवीत
यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला वेळेवर सुरूवात होणार असून सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांसाठी व कृषी विभागासाठी हे वर्ष समाधानाचे जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

पेरणीसाठी बळीराजा सज्ज
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक उद्योगधंदे यासह सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ,व्यवसायिक क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम झालेला असून त्याचा फटका कृषी विभागालाही बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात शेती व्यवसायाला काही अंशी सूट मिळाली आहे. बळीराजा आता शेतीच्या पूर्वमशागतीसह इतर कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज होतो आहे. कंधार तालुक्यात खरीप पेरणी क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून मुख्य पीक कापूस २८ हजार हेक्टरवर लागवड केले जाते. त्यानंतर सोयाबीन २२ हजार हेक्टरवर पेरले जाते. त्यानंतर ज्वारी, तुर, मुग, उडीद ही खरीप पिके प्रामुख्याने घेतली जातात.

रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी चांगली
तालुक्यात मागील खरीपासह रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. पीक घनता जवळपास १३४ टक्के झाली आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू, रब्बी ज्वारी तर उन्हाळी हंगामात भुईमूग, ज्वारी या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. तर तिळासह भाजीपाला, चारा पिकांची लागवड करण्यात आली.

उगवणशक्ती तपासुन घरचे सोयाबीन बियाणे वापरावे
आगामी खरीप हंगामात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्याच्या सुचना करण्यात येत आहेत. या सोयाबीनची उगवणक्षमता तपासणी करणे व त्यानंतर बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्यावर विभागाने भर दिला आहे. सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्फत तालुक्‍यात गावोगावी घेतले जात असून नुकतीच उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते हाळदा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.

मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचा शुभारंभ
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बिजेवाडी येथे कल्पवृक्ष फळबाग लागवड अंतर्गत आंबा फळपीक लागवडीचा शुभारंभ श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. चालू वर्षी या योजनेतून इच्छुक पात्र लाभार्थ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणावर फळ पिकाची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बिजेवाडी येथे गजानन संभाजी डांगे यांच्या आंबा फळ लागवडीचा खड्डे खोदण्याचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच सन २०१८-१९ मध्ये या योजनेअंतर्गत लागवड केलेल्या संभाजी माणिकराव लुंगारे यांच्या आंबा लागवड केलेल्या फळपिकांच्या बागेला भेट देऊन पाहणी करण्यात आली.

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय
मागील काही वर्षापासून कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. या अळीमुळे दोन वर्षापूर्वी कापूस पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालेले होते. शेंदरी अथवा गुलाबी बोंड आळीचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाकडून मागील काही वर्षापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आल. विविध उपाययोजनाद्वारे सेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यातंर्गत कापूस फरदड मुक्ती अभियान राबविणे, पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड टाळणे, शेतातील पराठी काडीकचरा जाळून नष्ट करणे, क्रॉप सॅपच्या माध्यमातून गावोगावी निवडलेल्या कापूस प्लॉटची दर आठवड्याला निरीक्षणे नोंदवणे, किडीची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून त्वरित उपाय योजना सुचविणे, रासायनिक कीटकनाशके जैविक कीटकनाशके, कामगंध सापळे यासह प्रत्येक फवारणी सोबत निंबोळी अर्काचा वापर या बाबी प्रभावीपणे वापरल्याने या अळीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. 

घरीच बनवा निंबोळी अर्क 
रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च कमी करून लिंबोळी अर्काचा वापर केल्याने किडीचे नियंत्रण प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आले पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी ही फायदेशीर दिसून आली. निंबोळी अर्काची खरेदी बाजारातून न करता शेतातील व परिसरातील लिंबोणीच्या झाडाखाली निंबोळ्या जमा कराव्यात. उन्हात वाळवून सुकवून त्या लिंबोळीचा भरडा तयार करून असा पाच किलो भरडा दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून शंभर लिटर पाण्यात मिसळून वापरला तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये लिंबोळी अर्क तयार होते. अशा पद्धतीने निंबोळ्या गोळा करून घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रवृत्त करण्यात येत आहे.
 
फुळवळ एमआयडीसीत निमार्क निर्मिती केंद्रास भेट
तालुक्यात फुळवळ येथील एमआयडीसी येथे निंबोळी पासून निंबोळी भरडा व नीम तेल तसेच निमार्क तयार करण्यात येते आहे. त्याची माफक दरात विक्री केली जाते. त्याचाही फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. या प्रकल्पाला आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट दिली. तालुक्यातील व तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा निश्‍चितपणे फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी खरीप हंगामाबाबत सर्व शेतकरी बंधूंना व कृषी विभागाला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. मुंढे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, कृषी सहायक भुषण पेटकर, बंटी गादेकर, ज्ञानेश्वर चोंढे, उमराव आदमपुरे, प्रल्हाद डांगे, बालाजी डांगे, माधव लुंगारे, सुरेश राठोड यांची उपस्थिती होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT