नांदेड : नामाविन मुख सर्वांचे ते बीळ
जिव्हा नव्हे काळ सर्प आहे...
हरिवीण कोणी नाही सोडविता
पुत्र बंधू कांता संपत्तीचे....
मुखामध्ये हरीचे नाम नसेल तर अपशब्द बाहेर पडतात. ज्यामुळे स्वतःसोबतच इतरांचीही मने दुःखी होते. हरीच्या नामाशिवाय कोणीही दुःखातून सोडवू शकत नाही. त्यामुळे नियमित हरीचे नामस्मरण व्हावे असे संत एकनाथ महाराजांनी (Sant Eknath Maharaj) या अभंगातून समाजाला उपदेश केला. त्याला अनुसरून तरोडा (बु) (Nanded) येथे विठोबा रुक्माईचे मंदिर गजानन रावसाहेब आणि सचिन संजयराव देशमुख यांनी आजी-आजोबांच्या स्मरणार्थ उभारले आहे. हजारो वर्षांपूर्वी संतांनी लिहून ठेवलेल्या अभंगाचा (Abhang) प्रत्यय आपल्या जीवनात ठायीठायी येत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीय आज वारकरी (Warkari) संप्रदायाशी जुळलेले आहेत. वडिलोपार्जित सुरु असलेली ही परंपरा नवीन पिढीही पुढे नेटाने नेताना दिसत आहे. तरोडा येथील गजानन रावसाहेब आणि सचिन संजयराव देशमुख यांनी आजोबांची वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे अखंडित सुरु राहावी म्हणून आजी-आजोबांच्या स्मरणार्थ विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी केली. (family built vitthal rukhmai temple in memory of grand parents in nanded district glp88)
आजोबा विठ्ठलराव देवराव आणि आजी जिजाबाई विठ्ठलराव देशमुख यांची शेवटची इच्छा होती की आमच्या नावाने विठ्ठल रुक्मिणी मंदिराची (Vitthal Rukhmini Temple) उभारणी व्हावी. त्याच्या माध्यमातून समाजातील रंजल्या गांजलेल्यांना मदत करावी. वारकरी संप्रदायाची देशमुख घराण्याची परंपरा अखंडित सुरु ठेवावी म्हणून मंदिर उभारावे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नातू गजानन रावसाहेब आणि सचिन संजयराव देशमुख यांनी तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये विठ्ठल रुक्माईचे मंदिर उभारले आहे. मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्माईची मूर्ती पंढरपूर येथून विकत आणून भक्तीभावाने त्याची प्रतिष्ठापनाही केली. दररोज येथे नित्यनेमाने भजन-गायन होते. आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी परिसरातील अनेक भक्तजन देणगीसाठी पुढे आले. परंतु आजोबा आजीच्या इच्छेप्रमाणे संपूर्ण खर्च आम्हीच स्वतः केल्याचे गजानन आणि संजयराव देशमुख यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
एकत्र कुटुंबाचे अप्रतिम उदाहरण
एकत्र कुटुंब कसे असावे? याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे देशमुख कुटुंबीय आहे. परिवारातील सदस्य मधुकरराव, संजयराव, सुभाषराव, गजाननराव, पंजाबराव, भाऊराव, केरबाराव देवानंद देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रदीप देशमुख, विजय संजय देशमुख, गजानन देशमुख, समीर, मंगेश तसेच देशमुख जिमचे संचालक सचिन संजय देशमुख, गजानन रावसाहेब देशमुख वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडीत पुढे चालवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.