Filled chamber the usual headache plight people Cidco nanded sakal
नांदेड

तुंबलेले चेंबर नेहमीचीच डोकेदुखी ; सिडकोवासीयांची व्यथा

नवीन नांदेड : पालिकेचे ड्रेनेज सफाईकडे सोयिस्कर दुर्लक्ष

श्याम जाधव

नवीन नांदेड : खेड्यालाही लाजवेल अशी सिडको भागातील परिस्थिती असून आजही नागरिकांचे मूलभूत प्रश्न कायम आहेत. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अतिरिक्त ताण पडून सिडकोतील वारंवार भरणाऱ्या चेंबरमुळे सांडपाणी घरांमध्येच जमा होण्याचा प्रकार अनेक वेळा होत असतो परिणामी दुर्गंधीचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. महापालिकेकडून नवीन चेंबर लाईन टाकण्यात आलेली आहे.

पण आजही अनेक भागात कनेक्शन न जोडल्यामुळे सिडको स्थापणेपासून जुनीच मलनिस्सारण लाईन असल्याने त्यावर तान पडत आहे परिणामी वारंवार ती भरतात परिणामी दरवेळेस ही समस्या निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.चेंबर तुंबण्याच्या प्रकारामुळे चेंबरमधुन रस्त्यावर आणि घरात घाण पाणी येणे नेहमीचेच झाले आहे. पाठपुरावा केल्यानंतर चेंबर तुंबल्यावर केवळ नाममात्र स्वच्छता केली जाते. परत दोन तीन दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चेंबर तुंबणे नित्याचेच झाले आहे. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली त्यामुळे नागरिकांच्या मल, सांडपाण्याचा ताण त्याच जुन्या लाईनवर पडत आहे. यावर ताण वाढल्याने यातील बरेच चेंबर बंद होत असतात. तुंबलेल्या चेंबरबाबत महापालिका प्रशासनाकडून कुठलाही पुढाकार घेण्यात येत नाही. ड्रेनेज पूर्ण भरलेले आहे. या अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी याची जबाबदारी उचलण्यास तयार नाहीत.

ड्रेनेज व्यवस्था त्रासदायक

आजही सिडको भागातील या मलनिसारन वाहिन्या ३० वर्षांहून जुन्या झालेल्या असल्यामुळे त्यांच्यावर कमालीचा ताण पडत आहे. अनाधिकृत आणि अनियोजित विकासकामांमुळे जुन्या वाहिन्यांचे नूतनीकरण करणे कठीण होऊन बसले आहे. सिडकोतील मलजलवाहिन्या आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अनेक वेळा पिण्याचे पाणी सुद्धा प्रदुषित होण्याची नेहमीच शक्यता असते. ड्रेनेज व्यवस्था विचित्र आणि त्रासदायक बनली आहे.

केवळ दहाच सफाई कामगार

बोटावर मोजण्याईतके सफाई कामगार सिडको हडको नवीन नांदेड परिसरात असून केवळ दहाच सफाई कामगार असल्याचे एका अधिकाऱ्‍याने सांगितले. त्यामुळे एवढा मोठ्य परिसरात वाहिन्या साफ करण्यासाठी शक्यतो यंत्र वापरण्याची गरज असून अनेक वेळा कुठल्याही साधन सामुग्रीशिवाय ड्रेनेज लाइन साफ करण्याची तर ती साफ करायला कुदळ-फावडे घेत जुन्या पद्धतीनेच गटारी साफ केली जातात.

नागरिकांनी काळजी घ्यावी

अनेकवेळा गटारीत कचरा बाहेर काढण्यात येतो, हा कचरा प्लॅस्टिकचा, अन्नपदार्थांचा अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स स्वच्छतागृहात किंवा गटारांमध्ये टाकले जातात. ते वाहत येऊन गटारांच्या तोंडाशी अडकतात व सांडपाण्याचा प्रवाह रोखला जातो. महिलांनी हे टाळायला हवे. याशिवाय, थर्मोकोल, कापडे, छोटी-छोटी भांडे, गटारात खूप वेळा सापडतात. लोकांनी काही गोष्टी व्यवस्थितपणे करायच्या ठरवल्या तर सफाई कामगारांचे काम कमी होईल.

नळाच्या ठिकाणी चेंबर आहे, त्यामुळे चेंबर भरले की पाणी भरणे तर सोडा भांडी सुद्धा धुता येत नाही. यावर कायमस्वरुपी इलाज करावा कारण नेहमी चेंबर भरतात.

- सुशीला भदरगे, महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT