नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यात चार ठिकाणी सभा होणार आहे. नांदेडला वाडीपाटी जिजाऊ नगर, मारतळा (ता. लोहा), नायगाव आणि कंधारला जाहीर सभा होणार असून त्यासाठी मराठा समाजातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मारतळ्यात पारंपारिक पद्धतीने स्वागत
मारतळा : मारतळा (ता. लोहा) येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता सभा होणार आहे. यासाठी २४ गावातील मराठा बांधवांनी तयारी करत जरांगे पाटील यांचे स्वागत पुष्पवृष्टी करून वारकरी दिंडी व पारंपरिक पद्धतीने होणार आहे. उमरा सर्कलच्या पुढाकारातून शंभर एकरचे मैदान सुसज्ज करण्यात आले आहे. बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे दीड हजार स्वयंसेवकांचा समावेश आहे. बांधवांसाठी दहा हजार पुरी, भाजी पाकीट, १५ हजार बुंदी पाकीट, ४५ क्विंटलची खिचडी, २५ हजार पाणी बॉटल व २५ हजार पाणी पाकिटे व पार्कींगच्या ठिकाणी पाण्याची सोय केली आहे.
मुस्लिम बांधवांकडून नाष्टा
वसंतवाडी (ता. मुदखेड) येथील बांधवांकडून दहा हजार पुरी भाजी पाकिटे व उमरा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून १० हजार बुंदी व पाणी बॉटल वाटप, नांदेड येथील फिरोज खान व मुस्लिम बांधवांकडून २० हजार नाष्टा व पाणी पाकिटे तसेच काकांडी येथील बांधवांकडून १० क्विंटलची खिचडी व तर टाकळगाव येथील बांधवांकडून पाच क्विंटलची तर आयोजकांकडून ३० क्विंटलची खिचडी, तर ओबीसी बांधव बाबु नागेश्वर यांच्याकडून १६ हजार पाणी पाकिटे वाटप होणार आहे.
कंधारमध्ये मुस्लिमांकडून सभेच्या जागेसाठी सहकार्य
कंधार : श्री शिवाजी हायस्कुलच्या मैदानावर शुक्रवारी (ता. आठ) सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. या अनुषंगाने येणाऱ्या लोकांसाठी मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानची मोकळी जागा देऊ केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.