food in wedding. Sakal
नांदेड

लग्नातील स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ

इंधनवाढीचा परिणाम : यजमान आले मेटाकुटीला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर लग्नसराई धुमधडाक्यात सुरु असली, तरी इंधन दरवाढीबरोबरच खाद्यतेल, बासमती तांदुळ, भाजीपाला, मजुरी यांचे दर वाढल्याने स्नेहभोजनाचे दरही २५ ते ४० टक्क्यांनी कडाडले आहेत. यामुळे आधीच अन्य खर्चामुळे मेटाकुटीला आलेले यजमान या दरवाढीमुळे आणखी कात्रीत सापडले आहेत. एप्रिल ते जूनचा पहिला पंधरवाडा हा लग्नसराईचा हंगाम समजला जातो. गेले दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने लग्नासारख्या महत्त्वाचा विधी हा या निर्बंधामध्ये करण्याऐवजी तो अनेकांनी पुढे ढकलणे पसंत केले होते. यंदा कोरोनाचे सावट काहीसे सैल झाल्याने दोन वर्षे रखडलेले तसेच यंदा ठरलेले लग्नकार्याची धांदल उडाली आहे. मात्र, या लग्नसराईला महागाईने गाठले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गॅस सिलिंडर, डिझेलसह इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनातील या दरवाढीमुळे जवळपास सर्वच किराणा सामानाचे दर महागले आहेत. दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत भडकलेल्या खाद्यतेलाने आपल्याकडेही महागाईचा कळस गाठला आहे. सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेल्या मंगल कार्यालयात सधा शिरा-भाताचे जेवण असेल तर पूर्वी ताटाला ८० रुपये द्यावे लागत होते. आता या पदार्थांच्या जेवणाचे ताट १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच साधा भात, मसाले भात, वांगी-बटाटा भाजी, आमटी, कोशिंबीरसह एखादे पक्वान्न या ताटाचे दर दीडशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत. पुरीसह बासुंदी, श्रीखंड, अंगूर मलई अशा विशिष्ट पदार्थांची मागणी असेल तर त्यासाठी ३०० रुपये प्रतिताट मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी या पदार्थाचे ताट २२५ ते २५० रुपयांपर्यंत मिळत होते.

ताटासाठी मोजावे लागतात सहाशे रुपये

सर्व सुखसुविधांनी युक्त अशा क्लब, रिसाॅर्टवरील भोजनावळीचे दर तर आता मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मलई कोप्ता, कटलेट, काजू, बदामयुक्त बासमती तांदळाचा मसाले भात, रसमलई, काजूपनीर, गोबी मंचुरियन, गोबी सांबर यांची मागणी असलेल्या ताटासाठी आता ६०० रुपये मोजावे लागत आहेत. दरवाढीचे हे आहे कारण दोन महिन्यांपू्र्वी बावीसशे रुपयांना मिळत असलेला १५ लिटर खाद्यतेलाचा डबा सध्या २७०० ते २९५० रुपयांवर पोहोचला आहे. ८० ते १०० रुपये किलो मिळणारा बासमती तांदूळ १२० ते १४० रुपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम म्हणून कार्यालयातील भोजनावळीचे दरही वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT