File photo 
नांदेड

नांदेड : डिसेंबरमध्ये गॅस दरवाढीच्या किमतीत शंभर रुपयांचा भडका

प्रमोद चौधरी

नांदेड : घरगुती गॅस वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीचा डिसेंबर महिन्यात शंभर रुपयाने भडका झाला आहे. याचबरोबर व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 

एकाच महिन्यात घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने महिलांचे स्वयंपाक घराचे बजेट कोसळले आहेत. तर ग्रामीण भागातील बहुतांश लोक सिलेंडर खरेदीसाठी एवढी मोठी रक्कम देवून खरेदी करू शकत नसल्याने आजच्या घडीला ग्रामीण भागातील काहींच्या घरातील सिलेंडर शो पिस बनले आहे. परिणामी दरवाढीच्या भडक्याने पुन्हा एकदा घराघरातून चुली पेटू लागल्या आहेत.

सिलेंडर दरवाढीमुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे व्यावसायीक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने या दरवाढीचा फटका त्यांना बसला आहे. आधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक बेरोजगार हे कामाच्या शोधात आहेत. अनेक जण तर पोटाची खळगी भरण्यासाठी व मिळेल ते काम करण्याची खुणगाठ बाळगून मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या गावांकडे धाव घेताना दिसून येत आहे. तर काही जण याआधीच आपले गाव सोडून तिकडे गेले आहे. 

अशी बिकट परिस्थिती असताना सिलेंडर खरेदीसाठी एवढी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला असताना आता भरीसभर गॅस सिलेंडरच्या किमतीत तेही डिसेंबर महिन्यात शंभर रुपयाने वाढ झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी घरगुती सिलेंडरचे दर ६१४ रुपये होते. यात दोन डिसेंबर रोजी ५० रुपये तर १५ डिसेंबर रोजी ५० रुपये अशी एकूण शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. 

डिसेंबर महिन्यात झालेल्या दरवाढीमुळे आता शहरातील सिलेंडर खरेदीसाठी ७१४ रुपये मोजावे लागत आहे. दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरचे दर सुमारे १०० रुपयाने वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी हे व्यावसायिक सिलेंडर विकत घेण्यासाठी १३५० रुपये द्यावे लागत होते. आता १४५० रुपये मोजावे लागत आहे. याचा थेट फटका व्यावसायिकांना बसत असल्याने त्यांच्यामध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT