file photo 
नांदेड

शेतकऱ्यांसाठी चांगली बाजमी : तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन- सुधीर पाटील  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हंगाम 2020- 21 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी मंगळवार (ता. २९) पासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.   

जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020- 21 साठी नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, कंधार, लोहा याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रती क्विंटल सहा हजार रुपये आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक प्रत आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असेही आवाहन सुधीर पाटील यांनी केले आहे.  

ब्रम्हपुरी गोदावरी नदी पात्र परिसरात कलम 144 लागू

नांदेड : शहराला लागूनच असलेल्या ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून ता. 28 डिसेंबर 2020 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु: सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT