कोरोना नांदेड मिटर 
नांदेड

दिलासादायक बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ५६४ रुग्ण; त्रीसुत्रीचा वापर करा- डाॅ. विपीन

जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या एक हजार 691 अहवालापैकी 44 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर अँटिजेन तपासणीद्वारे 28 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 870 एवढी झाली असून यातील 87 हजार 872 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 564 रुग्ण उपचार घेत असून आठ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

ता. 11 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार 895 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, किनवट एक, हदगाव एक, लोहा एक, उमरी एक तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 14, हदगाव एक, मुखेड एक, नांदेड ग्रामीण तीन, कंधार एक, नायगाव एक, भोकर एक, लोहा एक, हिंगाली दोन, देगलूर एक, मुदखेड एक, लातूर एक असे एकूण 44 बाधित आढळले.

हेही वाचा - असा पराक्रम करणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली

शुक्रवारी जिल्ह्यातील 97 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे चार, मुखेड कोविड रुग्णालय तीन, हिमायतनगर तालुक्यातर्गंत तीन, बारड कोविड केअर सेंटर एक, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड पाच, देगलूर कोविड रुग्णालय दोन, माहूर तालुक्यातर्गत एक, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 58, किनवट कोविड रुग्णालय दोन, खाजगी रुग्णालय 18 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

622 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 29, लोहा कोविड रुग्णालय तीन, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर एक,किनवट कोविड रुग्णालय 17, देगलूर कोविड रुग्णालय सहा, हदगाव कोविड रुग्णालय दोन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 349, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय 33 व्यक्ती उपचार घेत आहेत.

येथे क्लिक करा - खेळांतील गत वर्षीच्‍या कामगिरीवर आधारीत क्रीडा सवलतीचे गुण दिले जाणार आहेत

जिल्ह्याचा कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 70 हजार 954

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 68 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 870

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 872

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 895

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.70 टक्के

शुक्रवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

शुक्रवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

शुक्रवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 564

शुक्रवारी रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT