नांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या चार हजार 344 अहवालापैकी एक हजार 105 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 895 तर अँटिजेन तपासणीद्वारे 210 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 76 हजार 55 एवढी झाली असून यातील 61 हजार 171 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 हजार 193 रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
ता. 23 ते 25 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या एक हजार 430 एवढी झाली आहे. ता. 23 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे कंधार येथील 84 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे डोंगरगाव येथील 72 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे साईनगर येथील 648 वर्षाची महिला, शाहुनगर गोकुंदा येथील 70 वर्षाची महिला, संजिवनी रुग्णालय येथे किशोरनगर नांदेड येथील 72 वर्षाची महिला, ता. 24 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सिध्दार्थनगर नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, कुरुळा तालुका कंधार येथील 77 वर्षाचा पुरुष, सगरोळी तालुका बिलोली येथील 35 वर्षाचा पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 38 वर्षाची महिला, भाटेगाव तालुका हदगाव येथील 18 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे हिमायतनगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, व्हिजन रुग्णालय येथे कारेगाव तालुका लोहा येथील 45 वर्षाची महिला, पेनुर तालुका लोहा येथील 45 वर्षाचा पुरुष, बारड येथील 60 वर्षाचा पुरुष, न्यु यशोदा रुग्णालय येथे वर्ताळा तालुका मुखेड येथील 73 वर्षाचा पुरुष, उमरेकर रुग्णालय येथे वाघत तालुका भोकर येथील 60 वर्षाची महिला, गोदावरी रुग्णालय येथे खैरगाव तालुका नायगाव येथील 75 वर्षाची महिला, आश्विनी रुग्णालय येथे संभाजी नगर नांदेड येथील 78 वर्षाची महिला, मेडीकेअर तालुका लोहा येथे पांगरी तालुका लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथे हिंगणी तालुका बिलोली येथील 65 वर्षाचा पुरुष,दिनांक 25 एप्रिल रोजी गुरुजी रुग्णालय येथे संभाजीनगर नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, श्री साई रुग्णालय, लोहा येथे नवरंगपुरा तालुका कंधार येथील 52 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे इकराळा तालुका मुखेड येथील 48 वर्षाचा पुरुष, पानभोसी तालुका कंधार येथील 55 वर्षाचा पुरुष, माधवनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष , किल्ला रोड नांदेड येथील 50 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.42 टक्के आहे.
हेही वाचा -
रविवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 370, नांदेड ग्रामीण 37, अर्धापूर 31, भोकर 29, बिलोली 63, देगलूर 53, धर्माबाद 6, हिमायतनगर 41, कंधार 39, किनवट 17, लोहा 43, हदगाव 8, मुदखेड 28, मुखेड 33, नायगाव 37, उमरी 20, हिंगोली 17, लातूर 6, यवतमाळ 7, परभणी 8, नाशिक 1, असे एकूण 895 बाधित आढळले.
रविवारच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 30, अर्धापूर 15, भोकर 6, बिलोली 6, देगलूर 14, धर्माबाद 8, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 23, किनवट 25, लोहा 10, माहूर 8, मुदखेड 9, मुखेड 11, नायगाव 11, उमरी 25, हिंगोली 1, लातूर 1, चंद्रपुर 2 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 210 बाधित आढळले.
रविवारी जिल्ह्यातील 1 हजार 276 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 13, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 22, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 731, मुखेड कोविड रुग्णालय 90, हदगाव कोविड रुग्णालय 36, धमार्बाद तालुक्यातंर्गत 24, बिलोली तालुक्यातंर्गत 25, कंधार तालुक्यातंर्गत 15, देगलूर कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 74, नायगाव तालुक्यातंर्गत 3, अर्धापूर तालुक्यातंर्गत 30, हिमायनगर तालुक्यातंर्गत 1, लोहा तालुक्यातंर्गत 27, उमरी तालुक्यातंर्गत 15, मांडवी कोविड केअर सेंटर 13, माहूर तालुक्यातंर्गत 16, बारड कोविड केअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 117 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .
रविवारी 13 हजार 193 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 197, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 94, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 201, नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 41, माहूर कोविड केअर सेंटर 32, बारड कोविड केअर सेंटर 16, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 56, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, भोकर कोविड केअर सेंटर 13, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 105, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 72, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 111, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 65, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6 हजार 402, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 108, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 93, नांदेड जिल्ह्यात तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 928, देगलूर कोविड रुग्णालय 53, कंधार कोविड केअर सेंटर 22, खाजगी रुग्णालय 2 हजार 189, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 49, धर्माबाद कोविड केअर सेंटर 98, हैद्राबाद येथे संदर्भित 1, बिलोली कोविड केअर सेंटर 64, मुदखेड कोविड केअर सेंटर 21, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 9 असे एकूण 13 हजार 193 उपचार घेत आहेत.
रविवारचे कोरोना मीटर
एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 43 हजार 549
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 58 हजार 625
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 76 हजार 55
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 61 हजार 171
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 430
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.42 टक्के
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-69
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-364
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 13 हजार 193
रविवारी अतिगंभीर प्रकृती असलेले-249
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.