निवघाबाजार ( ता. हदगाव, जिल्हा नांदेड ) : कुंभार समाजासह सर्वच समाजातील मुल अभ्यासात हुशार असतात. परंतु त्यातील काहींची आर्थीक परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे या मुलांना अर्धवट शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांच्या व्यवसायात किंवा मजुरीने जावे लागते. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता नाही. अशा होतकरु व गरीब आणि वंचित कुंभार समाजातील मुलांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी 'कुंभदीपस्तंभ' हा व्हाटसअप ग्रुप पुढे आला. या ग्रुपच्या माध्यामातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थीक मदत मिळत असून शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत.
कुंभार समाजामध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. बर्याच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे मधूनच अर्धवट शिक्षण सोडावे लागते. सध्या जागतिक कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आॅनलाईनचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मोबाईल रिचार्ज साठीही काही पालकांकडे पैसे नसतात. अशाच एका खडतर प्रवासाचा सामना करीत असलेल्या ग्रामीण भागातील निवघाबाजार येथुन तिनं किलोमीटर अंतरावर असलेल्या हस्तरा ता. हदगांव येथील बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आर्यन अमोल उचाडे याला करावा लागला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीच्या असल्याने शिक्षणासाठी अडचणी येत होत्या. तो हुशार असून त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची शक्यता होती. ही माहिती कुंभदीपस्तंभ ग्रुपला कळाली असल्याने ग्रुपने आर्यनला आर्थिक मदत करुन धीर दिला.
हेही वाचा - नांदेड : आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे
यासाठी सामाजिक दायित्व स्विकारीत माहेश्वरी हार्डवेअरचे मालक अनुपजी सारडा व बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.मानसपुरे यांनीही आर्थिक योगदान दिले. आर्यनला शिक्षणासाठी मदत झाली असल्याने आणखी दानशूर व्यक्तींनी योगदान देण्याची गरज आहे.
यावेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे पत्रकार बंडू माटाळकर, रामेश्वर बोरकर, देविदास कल्याणकर, प्रभाकर दहीभाते, सुदर्शन कऱ्हाळे, किशन सोळंके व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष नामदेव भेणे, प्रमुख पाहुणे सुभाष तेटवार, प्रा. गजानन बनचरे, प्रा. नरसिंग पिंपरणे, आकाश बहणे, मोतीराम बमरुळे, रामचंद्र बमरुळे उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हरिश्चंद्र चिल्लोरे, सुभाष बहणे, अविनाश बमरुळे, श्रीकांत परडे यांचे सहकार्य लाभले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.