file photo 
नांदेड

हरभरा खरेदी केंद्र सुरूच राहणार.....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्राची मुदत मंगळवारी (ता. १६) संपल्यामुळे नोंदणी केलेल्या शिल्लक हरभऱ्याचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. परंतु राज्याच्या पणन सचिवांनी खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील खरेदी केंद्र पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी दिली.

जिल्ह्यात सोळा ठिकाणी खरेदी केंद्र
जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार १६ खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी करण्यात येत आहे. यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव, बिलोली व देगलूर या ठिकाणी खरेदी सुरु आहे. तर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नायगाव, भोकर व धर्माबाद या ठिकाणी केंद्र सुरु आहेत. तसेच महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून (महा एफपीसी) धानोरा (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव), डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार), मांडवा (ता. किनवट) धानोरा (ता. लोहा) ठिकाणी खरेदी सुरू आहे. 

दोन लाख १७ हजार क्विंटल हरभरा खरेदी
जिल्ह्यात आजपर्यंत २९ हजार ९०९ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे यातील १२ हजार ६२७ शेतकऱ्यांनी दोन लाख १७ हजार १२८ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आनला. त्यापैकी सर्वच शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी झाला आहे. खरेदी झालेल्या हरभऱ्यापैकी चार हजार ४२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६६ हजार ६६ क्विंटल हरभऱ्याचे ३२ कोटी २० लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. तर अद्याप आठ हजार ५०० शेतकऱ्यांच्या एक लाख ४८ हजार ५७६ क्विंटल हरभऱ्याची ७२ कोटी ४३ लाख एवढी रक्कम देणे शिल्लक असल्याची माहिती मिळाली. 

मंगळवारी संपली खरेदीची मुदत
हरभरा खरेदी केंद्राची मुदत मंगळवारी (ता. १६) संपल्यानंतर शिल्लक हरभऱ्याचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. परंतु बुधवारी राज्याच्या पणन सचिवांनी जिल्हा निबंधकांना खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाची मुदतवाढ येताच तसे आदेश पाठविण्यात येतील असे कळविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या हरभरा केंद्र पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणवीस यांनी दिली. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

Kolhapur Result : हसन मुश्रीफ, आबिटकरांचे मंत्रिपद निश्‍चित; अमल महाडिक, राजेश क्षीरसागरांनाही 'लॉटरी' शक्य

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT