Guardian Minister Girish Mahajan took darshan of Renuka Mata nanded news Sakal
नांदेड

Nanded News : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

नगराध्यक्षांनी माहूर विकासाचे तर व्यापाऱ्यांनी विविध मागण्याचे दिले निवेदन

साजीद खान

माहूर (जिल्हा नांदेड) :राज्याचे ग्रामविकास,पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन सध्या जिल्हा दौऱ्यावर असून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’च्या शुभारंभ निमित्त किनवट दौऱ्यावर आले असताना त्यांनी माहूर गडावर धावती भेट देत रेणुका मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली.

यावेळी श्री रेणुका देवी संस्थानाच्या वतीने संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी पालकमंत्री यांचा प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कानव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर उपस्थित होते.

राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आज (ता.१५) विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभाचे अनुषंगाने किनवट येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

त्या निमित्ताने त्यांनी प्रारंभी श्रीक्षेत्र माहूरगड येथे श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले.यावेळी श्री रेणुकादेवी मंदिरा पायथ्याशी असणारे व्यापाऱ्यांनी विविध समस्या शासन दरबारी मांडण्याचे अनुषंगाने आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानभवना समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन वसंत कपाटे,विकास कपाटे सह आदी व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले.

माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी पालकमंत्र्याचे यथोचित सत्कार करून माहूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावून माहूर गड विकासाची रखडलेली कामे मार्गी लावण्याची मागणी नामदार गिरीश महाजन यांच्या कडे केली.याप्रसंगी राज्यशासना कडून माहूर शहरासाठी प्राप्त झालेल्या निधीतील विकास कामाच्या उद्घाटन व लोकार्पण करिता पालकमंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित केले.

माहूर तीर्थक्षेत्रासह शहराच्या विकासासाठी शक्य ते करणार असल्याचे आश्वासन या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर,अशोक नेंमान्नीवार,विजय अमाले उपस्थित होते. दर्शन आटोपल्यानंतर पालकमंत्री किनवट येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ कार्यक्रमासाठी रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT