प्रमोद चौधरी
Nanded : गुरुद्वारा सचखंड बोर्ड एक वर्षापूर्वी आर्थिक संकटामध्ये सापडल्यामुळे अनेक कामे रखडली होती. भाविकांच्या सोयीसुविधांसह शैक्षणिक संस्थेवर देखील मोठा परिणाम झाला. बोर्डाचा अर्थसंकल्पही मंजूर झाला नव्हता. ५१ किलो सोने यापूर्वी वितळविण्यात आले. लेजर-शो बंद पडला. शाळेचे ७० लाखाचे नुकसान, साऊंड सिस्टीमही बंद पडली होती, अशा विविध समस्यांनी गुरुद्वारा संकटात आला होता.
डॉ. पसरीचा यांनी २९ जून २०२२ राजी प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारल्यावर बोर्डाची परिस्थिती सुधारण्यावर भर दिला. ३६९ कर्मचारी पदांवर कायम केल्यानंतर नऊ कोटीचा भार पडला. एफडी तोडून परिस्थिती सावरली. विविध रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नियोजन केले. किंबहुना बोर्डाचे उत्पन्न देखील वाढविण्यात आले.
भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केलेत. एकेकाही हा बोर्ड आर्थिक संकटात सापडला होता. काही बाबी गैर देखील घडलेल्या आहेत. त्या पुढे घडू नयेत यासाठी आपण गुरुघरची सेवा प्रामाणिक आणि निःस्वार्थपणे करत आहे. त्यामुळे गुरुद्वारा सचखंड बोर्डाने विकासाची उत्तुंग भरारी घेतली आहे.
सर्व समस्यांचे केले निराकारण
प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा येथील यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली होती. उत्पन्न आणि खर्च यात ताळमेळ नव्हता. ३७० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले होते, त्यामुळे ९०० कोटी रुपयांचा भार पडणार होता. दुकानांचे किराया थकले होते. लेझर शो बंद होता. पब्लिक स्कुल, आयटीआय या संस्था तोट्यात चालल्या होत्या.
पब्लिक ट्रस्टला इन्कमटॅक्स भरण्याची आवश्यकता नसताना इन्कमटॅक्स रिटर्न भरणे सुरु केले होते. प्रथम रात्र-रात्र जागून येथील समस्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून, आता या समस्यांचे निराकरण झाले असल्याचेही प्रशासक डाॅ. परविंदर सिंघ पसरिचा यांनी सांगितले आहे.
एका वर्षात मार्गी लावलेले प्रश्न
२०२३-२४ मध्ये ७८ कोटीवरून ११० कोटीवर अर्थसंकल्प नेला
बोर्डाच्या मालकीच्या गाळे व जमीन धारकांकडून दोन कोटी ७० लाख वसुल केले.
बोर्डाने मास्टर प्लॅन तयार केला.
अखंड पाठ जगात कुठेही घरी बसून बघता यावा यासाठी व्यवस्था केली.
बंद पडलेला लेजर शो, साऊंड सिस्टीम पुन्हा सुरु केली.
भाविकांसाठी ऑनलाइन रुम बुकिंगची व्यवस्था केली.
मुदत संपलेल्या किरायाच्या जागेचे रेंट रिव्हाईज केले.
असे आहेत उपक्रम
सर्वच समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग.
बेरोजगारीवर मात करण्यासाठी संगणक क्लासेस सुरु केले.
हेल्प लाईन कक्ष सुरु करून २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
हाॅस्पीटीलीटी सेवा सुरु केली.
खालसा स्कुल पूर्ण डिजिटल बनवले.
कोरोनामुळे गुरुद्वारा बोर्डाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. ३६ वर्षाच्या अनुभवाचा आधार घेत या सर्व परिस्थितीवर प्रशासक पदाच्या एक वर्षाच्या काळात मात करून बोर्ड नफ्यात आणला असून, विकासाच्या कामांनी गरुड झेप घेतलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.