अर्धापूर, (जि. नांदेड) ः तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरूवारी (ता.१९) जाहीर करण्यात आले असून अर्ध्या तालुक्यात महिलांच्या हाती कारभार येणार आहे. सरपंच पदांचे आरक्षण घोषित झाल्याने गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आत्ता प्रतिक्षा निवडणुकीच्या कार्यक्रमाची आहे. तालुक्यातील २३ गावांचे सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहेत. तर सरपंचपद जनतेतून निवडण्यात येणार कि सदस्यातून हे आद्याप प्रशासनाने स्पष्ट न केल्याने भावी सरपंच संभ्रमाच्या अवस्थेत आहेत. तर राखीव जागेवर आपण नाही तर आपली पत्नी, समर्थकांची वर्णी कशी लागेल यासाठी गावपुढाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
हेही वाचा - नांदेड : निरोगी आयुष्यासाठी नियमित शौचालयाचा वापर आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
तहसील कार्यालयात तहसीलदार सुजीत नरहरे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार दामोदर जाधव, मारोतराव जगताप यांनी सहकार्य केले. अर्धापूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सरपंचपदाचे २०२० व २०२५ चे आरक्षण सोडत गुरूवारी (ता.१९) काढण्यात आली. त्यामुळे आगामी काळात ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याचे चित्र दिसत आहे.
अर्धापूर तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या ग्रामपंचायत आरक्षित झाल्याने कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती झाली आहे. एससी प्रवर्गासाठी आठ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सुटले असून त्यामध्ये चार ग्रामपंचायत या महिलांसाठी राखीव आहेत. तर चार ग्रामपंचायती एससी वर्गासाठी आहे. ओबिसी प्रवर्गासाठी १२ जागा सुटलेल्या असून त्यामध्ये सहा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर सहा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. खुला प्रवर्गासाठी २४ जागा सुटलेल्या असून त्यामध्ये १२ महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर १२ खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. ४६ पैकी २३ महिला राखीव तर ८ एसी, २ एसटी, १२ ओबीसी, २४ ओपन असे आरक्षण सोडत झाली आहे.
अशी आहे आरक्षण सोडत
खुला प्रवर्ग महिला ः कामठा बु., कोंढा, चाभरा तांडा, डौर, दिग्रस-नांदला, देळुब खु., निमगाव, मेंढला खु., रोडगी, लोणी खु., शेणी, शेलगाव खु.या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुला प्रवर्ग ः अमराबाद, अमराबाद तांडा, खैरगाव बु., चाभरा, चोरंबा, देळुब बु., पांगरी-कारवाडी, बेलसर, मालेगाव, लहान, सावरगाव, सोनाळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसुचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग ः दाभड, धामदरी, पार्डी म., मेंढला बु., या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ः उमरी, जांभरून-कलदगाव, पिंपळगाव महादेव, बारसगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ओबीसी प्रवर्ग ः गणपुर, भोगाव, येळेगाव, शहापूर-अमरापूर-हमरापूर, शेलगाव बु., सांगवी-खडकी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ओबीसी महिला प्रवर्ग ः आंबेगाव, खैरगाव म., देगाव कु., देगाव बु., बामणी-वाहेदपूरवाडी-निजामपुर वाडी, लोणी बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसुचित जमाती महिला ः पाटणूर, (अनुसुचित जमाती सर्वसाधारण) चेनापूर.
संपादन - स्वप्निल गायकवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.