hungunda biloli 
नांदेड

हूनगुंदा रेती घाटातून बेसुमार उत्खनन; महसूल प्रशासनाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष

बिलोली तालुक्यातील मांजर नदी ही लाल रेतीचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. या रेतीला आंतरजिल्हा व परराज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे वाळू माफियाकडून रेतीचे घाट चालविण्यासाठी मोठी स्पर्धा होत असते

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून (Biloli city) जवळच असलेल्या हूनगुंदा येथील मांजरा नदीपात्रातील एका घाटातून दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैधरित्या (Sand illigal smugling in manjra river) उत्खनन होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे संबंधित महसूल प्रशासनासह पोलिस विभागही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. (Hoongunda- sand- dunes- Ignoring- the- 'meaning'- of revenue -administration)

बिलोली तालुक्यातील मांजर नदी ही लाल रेतीचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. या रेतीला आंतरजिल्हा व परराज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे वाळू माफियाकडून रेतीचे घाट चालविण्यासाठी मोठी स्पर्धा होत असते. त्याच अनुषंगाने गेल्या काही दिवसापूर्वी हूनगुंदा येथील मांजरा नदीपात्रातील एका खासगी घाटातुन चार हजार ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी आनंद पाटील नावाच्या व्यक्तीस प्रशासनाने दिली होती. पण या संबंधित खासगी ठेकेदाराने तालुक्यातील एका मोठ्या राज्यकीय नेत्याच्या नातेवाईकाला हा घाट चालविण्यास दिला आहे. या ठेकेदाराने आपली राज्यकीय शक्ती वापरत शासनाने ठरवून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवत मांजरा नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करीत असून आपलं कोणीही वाकड करणार नाही या अविर्भावात वागत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - धमकीच्या मेलमध्ये दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी संदेश लिहिलेला होता. हॉटस्पॉटची क्षमता एक किलोमीटर लिहिलेली होती. १० कोटी रुपये आणि दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही संदेशात आरोपीने म्हटलेले आहे

या गंभीर बाबीकडे संबंधित महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या घाटावरुन दररोज मोठे ट्रक, टिपर, हायवा असे हजारो वाहने क्षमतेपेक्षा जास्त ओहरलोड पद्धतीने भरुन जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामिण भागाला जोडणारे रस्ते खराब जाले आहेत. या बाबीकडे महसूल प्रशासन, आरटीओ व पोलिस प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत दुर्लक्ष करीत आहेत. या खासगी घाटाकडे जिल्हाधिकारी हे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT