file photo 
नांदेड

लॉकडाऊनच्या काळात शहरातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय कसा करावा- शिवाजी शिंदे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : ता. 25 मार्चपासून होणाऱ्या लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश केवळ कर्मचारी व व्यापारी यांनाच नजरेसमोर ठेवून काढला असून शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही. विशेषतः शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी शेताकडे कसे जावे किंवा शेतीचा व्यवसाय कसा करावा याबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही बंदी नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित जाहीर करावे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ता. 25 मार्च पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळामध्ये  सर्व दुकानातील व्यवहार बंद करणार असले तरी कृषी व्यवसायाशी संबंधित लोकांना सवलत देण्यात आलेली आहे. तसेच सर्व वाहनांना सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी शेतावर जायचे कसे? शेतमाल आणायचा कसा? कृषी व्यवसायिकांच्या दुकानातून निविष्ठा मिळवायच्या कशा? त्या आणायच्या कशा? याबाबत कुठलेही या आदेशांमध्ये तारतम्य दिसून येत नाही. केवळ पांढरपेशा लोकांच्या सोयीनुसार या बंदचे आदेश काढण्यात आलेले आहेत. 

कित्येक शेतकरी आपल्या शेतीपासून दहा, वीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत दूरच्या अंतरावर असलेल्या शहरात राहून शेतात ये- जा करत आहेत. तर काही शेतकरी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नोकरीच्या ठिकाणी राहून शेताकडे ये- जा करुन शेती करत आहेत. काही तर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शेती असलेले शेतकरी लगतच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून शेती करतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे दररोज जाण्या-येण्यासाठी वाहनाशिवाय पर्याय नाही. मग अशा शेतकऱ्यांनी शेतात जायचे कसे व कामे करायची कशी हा एक यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे. बंदमध्ये सर्व वाहनांचा समावेश केला असला तरी दारु दुकाने व रेतीघाटांच्या बाबतीत कोणतीही सूचना नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव पिचवरून आला 'चिप'मध्ये! सचिन तेंडूलकरची RRP कंपनीत आहे मोठी गुंतवणूक

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीकडे तुरुंगातील डॉक्टरांनीच मागितली लाच

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा अंदाज, खबरदारी घेण्याचे आवाहन, जाणून घ्या हवामानाची स्थिती

Pitru Paksha 2024: पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये नकळत केलेल्या चुका पडू शकतात महागात, 'या' गोष्टींची घ्या काळजी

Royal Enfield Guerrilla 450 : दमदार फीचर्स आणि परफॉर्मन्स असलेली रॉयल एन्फिल्डची ‘गोरिला’ बाईक लॉन्च

SCROLL FOR NEXT