नांदेड- पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने व्हर्चुअल रॅली हा अभिनव उपक्रम संबंध राज्यभरात राबविण्यात आला. खा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी या व्हर्चुअल रॅलीमध्ये प्रचंड सहभाग नोंदविला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचा ता.12 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने व्हर्चुअल रॅलीचे राज्यभरात आयोजन केले होते. मुंबई येथे खा.शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - खळबळजनक घटना : नांदेडच्या दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह शिपाई निलंबीत- अधीक्षकांना शिवीगाळ करणे पडले महागात
नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालय डॉक्टर लेन, कदम हॉस्पीटल येथे वाढदिवसाच्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाहता आले. एका ठिकाणी आसनस्थ होवून हा सोहळा पाहिला. या कार्यक्रमात खा.शरद पवार यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यास सांगितले. तसेच मराठी जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. दिलेल्या सत्तेचे प्रत्येकांनी सोने करावे, सक्षमपणे कर्तव्य बजावावे असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी 5-7 वर्षात राज्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले व शरद पवार यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या व्हर्चुअल रॅलीचे नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील अनेक जणांनी उपस्थिती लावली.
येथे क्लिक करा - नांदेड : जिल्ह्यातील सर्व आमदार शेतकरी संघटनेच्या पाठीशी, खा. चिखलीकर यांनीही केले शरद जोशींना अभिवादन
यावेळी माजी उपमहापौर डॉ. शिला कदम, प्रदेश प्रतिनिधी कल्पना डोंगळीकर, मनपाचे माजी विरोधीपक्ष नेता जिवन पाटील घोगरे, सरचिटणीस गणेश तादलापुरकर, सरचिटणीस सय्यद मोला, उपाध्यक्ष बंटी लांडगे, सिंधुताई देशमुख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुजाहिद खान, तातेराव पाटील आलेगावकर, डी. बी. जांबरूनकर, प्राध्यापक मजरोद्दीन, मोहम्मद दानीश, रंगनाथ वाघ, गोवर्धन पाटील आलेगावकर, दिगांबरराव पोफळे, रतनराव सुर्यवंशी, सुनंदा जोगदंड, सईदा बेगम, नंदाताई किरजवळेकर, जिलानी पटेल, भिमराव क्षिरसागर, बालासाहेब मादसवाड, जयश्रीताई जिंदम, गोविंद पत्रे, गंगाधर कवळे, गजानन कल्याणकर, एकनाथ वाघमारे, धनंजय सुर्यवंशी, युनूस खान, मोहम्मदी पटेल, सईदा पटेल, प्रकाश मुराळकर, श्रीधर नागापूरकर, वाघमारे, लक्ष्मण भवरे, राहुल जाधव, कन्हैया कदम, बालाजी माटोरे, शेख शफी, बच्चू यादव, नितीन मामडी, शेख शफी उर रहेमान, प्रशांत कदम आदी जण उपस्थित होते. शिस्तबध्द व कोरोनाचे सर्व नियम पाळून व्हर्चुअल रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद नांदेडमध्ये मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.