nanded sakal
नांदेड

नांदेडमध्ये रॉयल्टीच्या नावाखाली अवैध मुरूम उत्खनन

नेमका वरदहस्त कुणाचा? प्रशासनास ग्रामस्थांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

बारड : तहसील महसूल विभागाकडे नाममात्र शुल्क भरून रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुमाची बोकरी केली जात असून याकडे कानाडोळा केला जात आहे. राजरोसपणे बोकरी चालविणाऱ्यास नेमका वरदहस्त कुणाचा? असा थेट सवाल प्रशासनास ग्रामस्थातून केला जात आहे.जिल्ह्यात अवैधरित्या वाळू तस्करी, मुरूम उत्खनन यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रशासनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

यानंतर मुदखेड तालुक्यात उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्कराच्या उत्खननासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. यानंतर वाळू तस्करावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या धाडसी कार्यवाहीने ‘तस्करां’चे धाबे दणाणले होते. परंतू अवैध मुरूम उत्खनन याकडे मात्र प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येते. मुरूम उत्खननासाठी तहसील कार्यालयात रॉयल्टी भरून नियमावलीत अधीन राहून उत्खनन करण्याची मुभा असते.

मुरूम उत्खननासाठी शासनाची नियमावली ठरलेली आहे, परंतू नियमावलीचे आदेश जुगारून हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन केले जाते तेव्हा अवैध उत्खनन करणाऱ्यांना नेमका राजकीय वरदहस्त आहे की प्रशासनाचा वरदहस्त आहे ? हे न उलगडणारे ‘अर्थ’पूर्ण कोडे आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या हद्दीतील मुरुमाच्या बोकरीची कार्यवाही गुलदस्त्यात असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुरूम उत्खननासाठी मोठी फौज यंत्रणा असून यामध्ये जेसीबी, पाच टिप्पर यांचा समावेश असून रॉयल्टी मात्र शंभर ब्रासचीच कशी? यासाठी तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी पावतीवर मालाची वाहतूक, वेळेचे बंधन यासर्व बाबीचा समावेश करणे बंधनकारक आहे, परंतु संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याचे नेमके कारण काय? रात्रीच्या अवैध उत्खननाबाबत संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार दिसतो आहे.

रात्रीच्या वेळी मुरुमाची बोकरी केली असल्याची माहिती नायब तहसिलदार यांना दिली असता अगोदर उडवाउडवीची उत्तरे देत अखेरीस पोलिस प्रशासनाला पाठवतो असे सांगण्यात आले.

- राहूल आठवले, ग्रामपंचायत सदस्य, बारड.

दूरभाष वरून रात्रीच्या मुरूम उत्खननाची माहिती मिळताच संबधिताची दखल घेऊन तत्काळ उत्खनन थांबविल्याचे सांगितले.

- संजय नागमवाड, नायब तहसिलदार.

तहसील प्रशासनाने रात्रीला मुरूम उत्खनन केले जात असल्याचे सांगितल्यानंतर लगेचच पोलिस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन सर्व यंत्रणा बाहेर काढली.

- शिवराज तुंगावे, सहायक पोलिस निरीक्षक, बारड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT