नांदेड : सध्या कोरोना खुप फैलावला आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा कोरोना संसर्ग खुप लवकर होत आहे. कोरोनाची लक्षणे वरवर खुपच सौम्य आहेत. एक दोन दिवस ताप, थोडी सर्दी, एक दोन दिवस खोकला त्यामुळे बरेच पेशंट हे थंड पाणी पिण्यामुळे होत असेल, ऊन्हात फिरल्यामुळे होत असेल, मी कोणाच्या संपर्कात नाही. होईल दोन दिवसात बरा ? म्हणून स्वतः मेडीकलला जावुन सर्दी, खोकल्याचे औषधी घेत आहेत. तोपर्यंत पेशंटचा HRCT score-15 च्या पुढे जात आहे .oxygen एकदम 50 च्या खाली जात आहे .नंतर icu मध्ये ॲडमिट करुन उपयोग होत नाही.
ज्यांच वय 50 च्या वर आहे. किडनी, शुगर ,उच्च रक्तदाब आहे त्या पेशंटना दुरुस्त करणे कठीण होत चाललेले आहे. त्या पेशंटना रेमडेसीविर इंजेक्शन द्यायला अडचणी येत आहेत. थोडी जरी ताप, सर्दी, खोकला वाटला तर कुटुंबातील सर्वानी ॲंटीजन टेस्ट करा ( rtpcrटेस्टच्या रिपोर्टला वेळ लागत आहे .) जर कोरोना पाॕजिटीव्ह आला तर तिथेच मनपाची गाडी येत आहे. गाडीत बसुन ॲडमिट व्हा तिथे सर्व व्यवस्था आहे. ॲडमिट होणे म्हणजे तुरुंग समजु नका.
हेही वाचा - मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना
सध्या पर्याय नाही. कोरोनाचा नुसता फैलाव नाही तर त्सुनामी आहे. ही परिस्थिती अजुन कायम तीन महीने राहण्याची शक्यता आहे. असे डॉक्टर सांगत आहेत. सध्या रोज नांदेड मध्ये २० ते ३० रुग्ण दगावत आहेत. स्मशानभुमीवर वेटींग आहे. खेड्यात सुद्धा सध्या बरेच रुग्ण वाढले आहेत ते सांगायला लहाणपणा समजत आहेत. जे तरुण आहेत ते सहज आपोआप दुरुस्तही होत असतील पण ज्याच्या घरी म्हातारे आई- वडील आहेत त्यांना फार झपाट्याने संसर्ग होत आहे. त्यामुळे घरातील सर्वानी एकदाच अँटीजन टेस्ट करुन घ्या. यात घाबरण्यासारखे काही नाही. एका मिनिटात नाकातुन स्त्राव घेऊन रिपोर्ट कळतो. म्हणून वेळ करु नका. अंगावर काढु नका. रिपोर्ट आला तर संकोच करु नका. रिपोर्ट झाकुन ठेवु नका. त्यामुळे आपल्याकडून ईतराना बाधा होणार नाही. ईतराना आपल्या पासुन दुर ठेवा. जर लवकर ॲडमिट लवकर झालो तर दोन, तीन दिवसात अँटीबायोटीक इंजेक्शन देवुन दुरुस्त होत आहेत.
येथे क्लिक करा - नांदेड महापालिकेच्या सभेत अर्थसंकल्प सादर; महापौरांना सर्वाधिकार
जर ॲडमिट व्हायला उशीर झाला तर परिस्थिती गंभीर होत आहे. हा आजार आहे. झाकुन ठेवण्याची काही गरज नाही. जर झाकुन ठेवला,अंगावर काढला तर स्वतः ही संपत आहोत आणि कुटुंब, समाज यानाही संपवण्याच पाप आपल्या नशिबी येत आहे. म्हणून कळकळीची विनंती आहे. लक्षणे दिसताच टेस्ट करा. ॲडमिट व्हा. सध्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जावु नका. घराबाहेर पडु नका. भाजीपाला धुवुन घ्या. दुधवाल्यापासुन दुध दुरु उभा टाकून घ्या. मास्क वापरा, मास्कमुळे ९०% धोका टळतो. हात वारंवार धुवा. लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीपासुन दुर रहा. (त्याला राग आला तरी चालेल. जवळ थांबलो तर काही सेकंदात लागण होत आहे. ) स्वतः ची काळजी स्वतः घ्या. घराबाहेर पडु नका ही विनंती आहे.
हा इंव्हेट नाही. सर्वजण सिरियश होवुन काळजी घ्या. नांदेडची परिस्थिती खुप वाईट आहे. या सर्व बाबीला आपला निष्काळजीपणा कारणीभुत आहे. प्रशासन सातत्याने विनंती करत आहे. खुप मेहनत घेत आहेत. लोक ऐकत नाहीत. लोकांना कुठेही गैरसमज निर्माण करुन द्यायची सवय लागली आहे. हेच आपले अपयश आहे. कशाचा कोरोना आलाय ? आम्हाला काही होत नाही. उगी सरकार म्हणतेय ...? लस घेतल्यामुळे माणसे मरत आहेत. असा खोटा प्रचार केल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. या दोन महीन्यात लग्न संमारंभ, अंत्यविधीला जास्त लोक जमा होणे, तोंडाला मास्क न लावणे हे सर्व घटक कारणीभुत आहेत . नांदेड प्रशासन खुप मेहनत घेत आहे . कराव तेवढे कौतुक कमी आहे . अचानक संख्या वाढल्यामुळे प्रशासनावर ,दवाखान्यावर लोड वाढलेला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. विपीन हे नांदेडकरांना विनंती करुनसुद्धा लोक ऐकत नाहीत. ही नांदेडसाठी शरमेची बाब आहे. दवाखाना ते स्मशशानभुमी या सर्व घटकावरडाॅ. विपीन लक्ष ठेवुन आहेत. स्वतः डॉ. विपीन ईटनकर दिवसातुन एकदा स्मशानभुमीवर येऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. हे आम्ही बघितलय. डाॅ. विपीन यांनी खुप दुःख व्यक्त केले. लोकांनी सुद्धा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. प्रशासन फक्त बेडची उपलब्धता, मेडिसीनची उपलब्धता व जाहीर आवाहन यापेक्षा काय करु शकणार... ही जबाबदारी आपली आहे. ही वेळ आपल्या कुटुंबावर आल्यानंतर माणसाला कळेल की; हा रोग किती भयानक आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घ्या. घराबाहेर पडु नका. लवकर टेस्ट करा. जेवढा उशीर तेवढा धोका जास्त.
- नंदकुमार कांबळे यांच्या व्हाट्सअप या सोशल माध्यमावरुन साभार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.