नांदेड

बिलोलीत दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप! अनेकांना मिळाला दिलासा

विठ्ठल चंदनकर

दोन वर्षांपूर्वी एका शिबिराच्या माध्यमातून मोजमाप घेण्यात आले होते. त्यानंतर आता साहित्याचे वाटप झाल्यामुळे अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे

बिलोली (नांदेड) : येथील पंचायत समितीच्या वतीने पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (ता. २३) नागरिक व दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी एका शिबिराच्या माध्यमातून मोजमाप घेण्यात आले होते. त्यानंतर आता साहित्याचे वाटप झाल्यामुळे अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे.(in biloli, artificial materials were distributed to the citizens and the disabled)

सहा डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९ दरम्यान तालुकानिहाय ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग करिता कृत्रिम साहित्याचे वाटप करण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या मार्फत घेण्यात आले होते. दीड वर्षापूर्वी घेण्यात आलेल्या पात्र जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहा महिन्यापूर्वीच साहित्य उपलब्ध झाले होते. मात्र जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचे वाटप करण्यात आले नव्हते.

जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसापूर्वी नियोजन करून (ता. २१) जून ते दोन जुलै दरम्यान सदर साहित्य वाटप करण्याच्या सूचना प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार बिलोली धर्माबाद या दोन तालुक्यातील दीड हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पंचायत समितीच्या सभापती सुंदरबाई पाटील, माजी उपसभापती दत्‍तराम बोधने, पंचायत समिती सदस्य संभाजी शेळके, आंतर भारती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला पटने, डॉ. अनिल देवसरकर, डॉ मितेश, डॉ गिरीश, डॉ सुरूजन, डॉ रूपेश जाधव, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी श्री जाधव आदींच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले.

दोन्ही तालुक्यातील दीड हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक दिव्यांगासह मूक बधिर विद्यालय बिलोली, निवासी अपंग विद्यालय बिलोली, राजीव गांधी मतिमंद विद्यालय बिलोली येथील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तब्बल दिड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गरजूंना साहित्य मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साहित्य घरपोच दिले जाणार

बिलोली व धर्माबाद तालुक्यातील साहित्य दोन जुलै रोजी वाटप होणार होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार नियोजित तारखेपूर्वी ते वाटप करावे लागल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती व अन्य लाभार्थी वाटपाच्या दिवशी हजर राहू शकले नाहीत. ज्यांचे साहित्य उपलब्ध झालेले आहे. अशा सर्व लाभधारकांना त्यांच्या घरपोच साहित्य वाटप केले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, अनिल नरंगलकर, तारा अधिकारी श्री वाघ, श्री जाधव आदींनी दिली आहे. ज्यांना साहित्य मिळाले नाही अशा लोकांनी याबाबत अधिक चिंता करू नये असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT